आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे भाडेवाढीच्या विरोधात देशभरातून तीव्र संताप, मोदींच्या पुतळ्याचे दहन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारने रेल्वे बजेटपूर्वी रेल्वे भाड्यामध्ये सुमारे 14 टक्के आणि मालवाहतूक भाड्यात 6.5 टक्के वाढ करण्याच्या निर्णयाने देशभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी ठिक-ठिकाणी रस्त्यावर उतरून या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदींच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले आहे.

उत्‍तर प्रदेशात अलाहाबाद, कानपूरसह अनेक ठिकाणी समाजवादी पक्षाच्या कार्यर्त्यांनी आंदोलन केले आहे. भुवनेश्‍वरमध्ये डाव्या कार्यकर्त्यांनी तर दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. दिल्‍लीमध्ये आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याच्या फवा-याचा वापर करण्यात आला आहे.

अलाहाबादमध्ये सपाच्या कार्यकर्त्यांनी रेल रोको करत विरोध दर्शवला. अलाहाबादहून लखनऊकडे जाणारी गंगा-गोमती एक्सप्रेस आंदोलकांनी सुमारे अर्धा तास रोकली.

वाराणसीमध्येही रेल्वे स्थानकावर सपाने मोदींचा पुतळा जाळला. शनिवारी सपा कार्यकर्त्यांनी काशी स्टेशन वर जोरदार घोषणाबाजी केली.

गौडा-गडकरी पंतप्रधानांना भेटले
दरम्यान रेल्वे मंत्री सदानंद गौडा आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी शनिवारी पंतप्रधानांची भेट घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी पंतप्रधानांना भाडेवाढीनंतरच्या परिस्थितीबाबत माहिती दिली.
( भाडेवाढीद्वारे जनतेचा खिसा रिकामा करणा-या मोदींनी 2012 मध्ये मात्र बजेटपूर्वी केलेल्या रेल्वे भाडेवाढ करणा-या तत्कालीन यूपीए सरकारवर टीका केली होती. यावेळी मोदींनी केलेला ट्वीट पाहा शेवटच्या स्लाईडवर...)
पुढील स्लाइड्सवर पाहा देशभरातील आंदोलनांचे काही PHOTOS