आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agitation In Front Of I&B Ministry To Appose Gajendra Chavan

‘युधिष्ठिर’ खेळतील पुन्हा द्यूत, नियुक्तीला विराेध करत विद्यार्थ्यांची निदर्शने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाभारत या मालिकेत युधिष्ठिराची भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चव्हाण यांच्या पुण्यातील फिल्म अाणि टेलिव्हिजन संस्थेचे (एफटीअायअाय) अध्यक्षपदी केेेलेल्या निवडीला विद्यार्थ्यांचा तीव्र विराेध अाहे. या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या कार्यालयासमाेर निदर्शने केली.
‘हे ‘युधिष्ठिर’ ही संस्था जुगारात लावतील, तर नियामक मंडळातील अज्ञानांची टाेळी संस्थेचा नाश करतील,’ असा अाराेपही या विद्यार्थ्यांनी केला. या वादावर चर्चेसाठी केंद्र सरकारने अांदाेलक विद्यार्थ्यांना दिल्लीला बाेलावले हाेते. तेथे सुमारे २०० विद्यार्थ्यांनी राजधानीत येऊन अांदाेलन केले.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ व अायअायटीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना सहकार्य केले. ‘गजेंद्र चव्हाण परत जा, एफटीअायअायचे भगवीकरण थांबवा’ अशा घाेषणा देण्यात आल्या. अखेरीस पाेलिसांनी अांदाेलनकर्त्यांना ताब्यात घेतले. गजेंद्र चव्हाण हे फिल्म इंडस्ट्रीमधील महत्वाची व्यक्ती नाही, या क्षेत्रात याेगदान नसल्याने ते एफटीअायअायच्या अध्यक्षपदाला न्याय देऊ शकणार नाहीत. केवळ भाजपचे नेते असणे ही त्यांची याेग्यता असू शकत नाही, अशा शब्दात विद्यार्थ्यांनी त्यांच्या नियुक्तीला विराेध करणारे निवेदन केंद्र सरकारला दिले अाहेे. जाेपर्यंत ही नियुक्ती रद्द हाेत नाही ताेपर्यंत अांदाेलन सुरु राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सूचना अाणि प्रसारण मंत्री अरुण जेटलींना भेटून विद्यार्थी अापली भूमिका मांडणार अाहेत.