आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agreement Between The Union Govt. And Congress Broke On Last Minute

EXCLUSIVE: वढेरांचे नाव आल्याने फिस्कटली काँग्रेस-भाजपमधील डिल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनचा एक आठवडा कोणत्याही कामकाजाशिवाय संपला. ललितगेटवरुन विरोधकांची परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी आणि सरकारचा नकार यामुळे आठवडाभरात एक मिनीटही संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. असे यामुळे झाले की सरकार आणि विरोधकांमध्ये एक डील होता-होता राहीली. संसदेतील विरोधकांचा विरोध मावळण्याची शक्यता निर्माण झाली असताना एका भाजप खासदाराने रॉबर्ट वढेरा यांचे सभागृहात नाव घेतल्याने काँग्रेसने आपला विरोध अधिक तीव्र केला.
कशी सुरु होती बॅक चॅनल डिप्लोमॅसी ?
काँग्रेसच्या एका उच्चपदस्थ सूत्राच्या माहितीनूसार, पक्ष आणि सरकारमध्ये बॅक चॅनल डिप्लोमॅसी सुरु होती. काँग्रेस सदस्य पहिल्या आठवड्यात संसदेत गदारोळ करुन कामकाज होऊ देणार नाही.त्यानंतर बुधवारी तीन भाजप नेत्यांपैकी (शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे आणि सुषमा स्‍वराज) एक पदाचा राजीनामा देईल आणि त्यानंतर विरोधक शांत होतील व सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु होईल.

काँग्रेसने डिलसाठी अनेकांना केले होते तयार
काँग्रेसने या डिलसाठी समाजवादी पक्ष, सीपीएम, जनता दल (यू) आणि एनडीएच्याही काही घटक पक्षांना तयार केले होते. या पक्षांच्या नेत्यांसोबत अनौपचारिक चर्चा देखील झाली होती. या चर्चेसाठी काँग्रेसने गुजरातशी संबंधीत एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला जबाबदारी दिली होती.
असे काय झाले की चर्चा अचानक बंद पडली
गुरुवारी राजस्थानचे भाजप खासदार अर्जून राम मेघवाल यांनी लोकसभा सुरु झाल्याबरोबर वढेरांच्या फेसबुक पोस्टचा मुद्दा उपस्थित केला. मेघवाल यांनी त्याच दिवशी लोकसभाध्यक्षांना प्रिव्हिलेज मोशनची नोटीसही दिली. त्यानंतर काँग्रेस हायकमांडने डिलचा मार्ग बंद केला. त्यासाठी काँग्रेसने तर्क दिला की आम्ही डिल केली तर चर्चा होईल की वढेरा प्रकरणामुळेच काँग्रेस घाबरली आणि माघार घेतली .
भाजपने स्वतःला रोखले पण तोपर्यंत उशिर झाला होता
शुक्रवारी भाजप खासदारांनी संसदेत आणि बाहेरही रॉबर्ट वढेरांचे नाव घेतले नाही. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. त्यानतंर काँग्रेसने सुषमा स्वराज, शिवराजसिंह चौहान आणि वशुंधरा राजे यांचे राजीनामा घेतल्याशिवाय कामकाजच होऊ देणार नाही.

आत संसदेची स्थिती
लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसने स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्याशिवाय चर्चाच नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. स्वतः सुषमा स्वराज त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्यास तयार आहेत. मात्र काँग्रेस त्यांचे काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. ललितगेट आणि व्यापमंवर पंतप्रधानांनी धरलेले मौन हा देखील काँग्रेसच्या विरोधाचा मुद्दा आहे. राहुल गांधी यांनी यावरुन मोदींवरही हल्ला केला. मोदी हवेत गप्पा करतात, असे राहुल म्हणाले. तर, स्वराज यांनी गुन्हेगारी कृत्य आहे त्यांनी तुरुंगातच गेले पाहिजे असे म्हणून त्यांनी स्वराज यांच्यावरही तिखट हल्ला केला आहे.