आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी जिल्ह्यातील सुनंदाबाई शिंदे यांना कृषी संशोधन परिषदेचा पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मनोली येथील प्रगतिशील महिला शेतकरी सुनंदाबाई शिंदे आणि पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गोखले शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राला केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते रविवारी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

राष्ट्रीय कृषी विज्ञान संस्थेच्या ए. पी. शिंदे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशभरातील व्यक्ती व संस्थांना सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. वैयक्तिक गटात परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मनोली येथील प्रगतिशील महिला शेतकरी सुनंदाबाई शिंदे यांना ‘जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार २०१६’ प्रदान करण्यात आला. शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रयोग करून सोयाबीन, कपाशी आणि ज्वारी या पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले. पाण्याची प्रभावीपणे साठवण करून जलसंधारण क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले आहे. त्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...