आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Minister Radh Mohan Singh Answer For Former Suicide

कृषिमंत्री बडबडले - प्रेम, लग्‍न, नपुंसकतेमुळे शेतक-यांच्‍या आत्‍महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात शेतकरी आत्‍महत्‍येचा प्रश्‍न अत्‍यंत गंभीर बनला असताना केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितलेली शेतकरी आत्‍महत्‍येची कारणे ऐकूण कदाचित आपल्‍या भुवया उंचावतील. प्रेमप्रकरणं, कौंटुंबिक कलह, नपुंसकता, वांझपणा या कारणांमुळे शेतकरी आत्‍महत्‍या करतात, असे वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केले आहे. राज्‍यसभेमध्‍ये एका प्रश्‍नाला लेखी उत्‍तर देताना त्‍यांनी ही कारणे सांगितली आहेत. त्‍यांच्‍या या उत्‍तराचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला.
राज्यसभेमध्ये जनता दल संयुक्‍तचे खासदार के. सी. त्यागी यांनी शेतकरी आत्महत्येसंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला कृषिमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. त्‍यांनी सांगितलेली शेतकरी आत्‍महत्‍येची कारणे ऐकूण विरोधक चांगलेच खवळले आहेत.
NCRBच्‍या अहवालाची माहिती
कृषि मंत्रालयाच्‍या वतीने देण्‍यात आलेल्‍या उत्‍तरांमध्‍ये म्‍हटले आहे की, ''नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्‍यूरोनुसार (एनसीआरबी) शेतकरी कौटूंबिक कलह, आजारपण, व्‍यसनाधिनता, बेरोजगारी, संपत्‍तीचे वाद, व्‍यवसायासंबंधी समस्‍या, वांझपणा, नपुंसकता, हुंडाबळी, वैवाहिक वाद आदी विविध सामाजिक कारणांमुळे आत्‍महत्‍या करत आहे.''
साडेतीन वर्षामध्‍ये 3200 शेतकत्‍यांच्‍या आत्‍महत्‍या
कृषिमंत्र्यांनी दिलेल्‍या उत्‍तरात असेही म्‍हटले आहे की, शेतकरी आत्‍महत्‍येची बहुतेक कारणे ही शेतीच्‍या वादाशी संबंधित आहेत. त्‍यामध्‍ये कर्जाची परतफेड न होणे, पिकाचे नुकसान, दुष्‍काळ आदी कारणे आहेत. साडेतीन वर्षात 3200 शेतक-यांनी आत्‍महत्‍या केल्‍या आहेत अशी माहितीही उत्‍तरात देण्‍यात आली आहे.