नवी दिल्ली - वायुदलाने ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून खरेदी केलेल्या तीन एडब्ल्यू - 101 हेलिकॉप्टरचा वापर थांबवला आहे. या हेलिकॉप्टरचे सुटे भाग उपलब्ध होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सुट्या भागांचा तुटवडा दूर झाल्यानंतर त्यांचा वापर पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. व्हीव्हीआयपी लोकांच्या वाहतुकीसाठी भारताने ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी केले होते. 12 हेलिकॉप्टरच्या सुमारे 3,600 कोटी रुपयांच्या सौद्यासाठी 360 कोटी रुपयांची लाच दिल्याची माहिती उजेडात आल्यानंतर भारत सरकारने हा सौदाच रद्द केला होता. या प्रकरणााची सध्या चौकशीही करण्यात येत आहे.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)