आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AgustaWestland Hasn\'t Returned Approximately 106 Million Euros For Three Choppers

ऑगस्टा वेस्टलँड: पावसाळी अधिवेशनात बघून घेऊ : आझाद यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- आॅगस्टा वेस्टलँडवरून सत्ताधारी भाजप व काँग्रेस यांच्यातील वाक््युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी राज्यसभेबरोबरच बाहेरही ते पाहायला मिळाले. काँग्रेसनेच काळ्या यादीत टाकलेल्या फिनमेकानिकासाठी अनेक नियमांची तोडमोड करण्यात आली होती. त्यासाठी नेमक्या कोणाकोणाला ‘लाभ ’मिळवून देण्यात आला, असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केला आहे.

शहा यांनी सोनियांना लक्ष्य करताना कंत्राटासाठी लाच घेणाऱ्याचे नाव जाहीर करण्याची मागणी केली. सोनियांनी त्याचे उत्तर द्यावे, देशाला त्यांच्याकडून उत्तर हवे आहे, असे त्यांनी म्हटले. त्यावर काँग्रेसने राज्यसभेत प्रतिहल्ला चढवला. सरकारला या प्रकरणाचा खरेच छडा लावण्याची इच्छा असल्यास त्यांनी सत्याने वागावे. दोन महिन्यानंतर पावसाळी अधिवेश आहे. सरकार खरे असेल तर त्यांनी मुकाबला करून दाखवावा. तेव्हा दाखवून देऊ. खरे तर सरकारने हे प्रकरण जाणीवपूर्वक उकरून काढले असून काँग्रेसला बदनाम करण्याची ही घृणास्पद मोहिम आहे, असा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला. दरम्यान, यूपीए सरकारच्या काळात फिनमेकानिकाला काळ्या यादीत टाकण्यात आले होते, असे वक्तव्य राज्यसभेतील विरोदी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केले होते. त्यावरून सुब्रमण्यम स्वामी यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली. त्यावर काँग्रेसने संरक्षण मंत्रालयाला देखील अशी नोटीस पाठवण्याची मागणी केली.

सरकार चर्चेस तयार, जितेंद्र सिंग यांचे वक्तव्य
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील नेमके सत्य काय आहे, हे देशाला कळलेच पाहिजे. काँग्रेस काही तरी दडवू पाहत आहे. म्हणूनच सत्य बाहेर येऊ देण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे, असा टोला जितेंद्र सिंग यांनी लगावला आहे. काँग्रेसचा नामोल्लेख न करता सिंग म्हणाले, सरकार या प्रकरणी चर्चेस तयार आहे.
केवळ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळाच नव्हे तर सर्वच प्रश्नावर सरकार चर्चेस तयार आहे, असे सिंग यांनी स्पष्ट केले.

माजी हवाई दलप्रमुख त्यागी यांना समन्स
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने माजी हवाई दल प्रमुख एस.पी. त्यागी यांना समन्स पाठवले आहेत. या प्रकरणात त्यागी यांच्यावर प्रसारमाध्यमातून अनेक आरोप करण्यात आले होते. त्यागी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

काय आहेत प्रश्‍न...
1# कुणाच्‍या सांगण्‍यावरून या कंपनीला टेंडर दिले गेले आणि त्‍यात छेडछाड करण्‍यात आली ?
2# फील्ड ट्रायल भारतात का करण्‍यात आले नाही ?
3# यातील सावळा गोंधळ लक्षात आल्‍यानंतरच टेंडर रद्द का केले गेले नाही. लाच दिल्‍याचे सिद्ध होईपर्यंत का वाट पाहिली ?
4# डीलसाठी दिलेला पूर्ण पैसा आतापर्यंत का परत आला नाही?
केजरीवालांनी भाजप-कॉंग्रेसवर केली टीका
ऑगस्टा वेस्टलँड डीलमधील भ्रष्टाचारावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेस दोघांवरही निशाणा साधला आहे. शुक्रवारी ट्विट करुन ते म्हणाले, 'इटली कोर्टच्या ऑर्डरमध्ये जर माझे नाव असते तर मोदींनी आतापर्यंत मला अटक केली असती. मात्र सोनियांची चौकशीही केलेली नाही. काय कारण आहे ? मोदींनी माझ्यावर CBI ला छापा टाकायला लावला, सोनिया आणि वढेरांवर कोणतीच कारवाई नाही. मोदींना गांधी कुटुंब फार प्रामाणिक वाटते. अमित शहा हात जोडून सोनियांना विचारत आहेत, की प्लीज सांगा लाच कोणी घेतली. असा तपास होत असतो का? असे असेल तर मग CBI, ACB बंद करुन टाका.'
अमित शहा यांनी गुरुवारी काय म्‍हटले होते
- ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातील कथित लाचखोरीवरून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी सोनिया गांधी यांना लक्ष्य केले. या प्रकरणात कुणाकुणाला लाच मिळाली ते सोनियांनी सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले.
- ‘मी कुणाला घाबरत नाही, असे काँग्रेस अध्यक्षा म्हणत आहेत. म्हणजे असे प्रकार नेहमीच घडले. आम्ही भाजप नेते मात्र कायदा, शासन, घटना आणि लोकलज्जेला घाबरतो,’ अशा शब्दांत अमित शहा यांनी सोनियांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
- नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातही सोनियांनी असेच वक्तव्य केले होते. मात्र, ही लाच दिली किंवा घेतली गेली तेव्हा सत्तेत कोण होते, हाच आमचा प्रश्न आहे, असेही शहा म्हणाले.
ऑगस्टा वेस्टलँडने 800 कोटी नाही केले परत
ऑगस्टा वेस्टलँडने 800 कोटी नाही केले परत, दिल्लीत आहे तीन हेलिकॉप्टर कंपनीला ही रक्कम तीन हेलिकॉप्टरच्या बदल्यात द्यायचे होते. भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर कंपनीने तीन हेलिकॉप्टर भारतात पाठवले होते, जे आजही दिल्लीतील पालम विमानतळावर उभे आहेत. हेलिकॉप्टरचा व्यवहार रद्द झाल्यानंतर या तिन्ही हेलिकॉप्टरचा कधीही वापर झाला नाही.
हेलिकॉप्टर आल्यानंतर कशी बदलली इटलीतील परिस्थिती
- हे हेलिकॉप्टर नोव्हेंबर 2012 मध्ये कंपनीने भारतीय नौदलाला दिले होते.
- त्यानंतर नऊ महिन्यांनी ऑगस्टा वेस्टलँड डीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इटलीत एकाला अटक झाली होती.
- भारत सरकारने ऑगस्ट वेस्टलँडला केलेल्या पेमेंटच्या वसुलीसाठी आर्बिट्रेशन (मध्यस्थी) प्रक्रिया सुरु केली होती, तोपर्यंत या हेलिकॉप्टरने 556 तासांचे उड्डाण केले होते.
CAG रिपोर्टमध्ये झाला होता खुलासा
- ऑगस्ट 2013 मध्ये संसदेत सादर झालेल्या कॅग रिपोर्टमध्ये दोन गडबडींकडे इशारा करण्यात आला होता.
- रिपोर्टमध्ये म्हटले होते, की करार समितीने किंमत 4877.5 कोटी सांगितली होती. तर, जानेवारी 2006 मध्ये त्याची किंमत 793 कोटी म्हटल्या गेली होती. म्हणजे ही किंमत सहा पटीने वाढवण्यात आली होती.
- तर, दुसरीकडे वेंडरने 3966 कोटी किंमतीची ऑफर दिली होती, त्या उलट समितीने 22.80 टक्के जास्त अर्थात 4877.5 कोटी रुपेय देण्यास मान्यता दिली होती.
काय आहे प्रकरण
- यूपीए-1 सरकारच्या काळात 2010 मध्ये भारताशी झालेल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाला होता, असा निकाल इटलीतील एका न्यायालयाने दिला आहे.
- डील 3,600 कोटी रुपयांची होती. एकूण डीलच्या 10% हिस्सा लाच म्हणून देण्यात आला होता. त्यानंतर यूपीए सरकारने 2010 मध्ये डील रद्द केली.
- या व्यवहारातील 3 हेलिकॉप्टर भारतात आले होते, मात्र भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर त्यांचा वापर बंद झाला. आजही दिल्लीतील पालम विमानतळावर हे तिन्ही हेलिकॉप्टर उभे आहेत.
- हवाई दलाचे तत्कालीन प्रमुख एस. पी. त्यागी यांनी तेव्हा लाच घेतली होती, असा स्पष्ट उल्लेख करून सिग्नोरा गांधींसह अनेक नावांचा निकालात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, काँग्रेस आरोपीच्या पिंजऱ्यात का