आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Indian Air Force Chief Tyagi Involved In VVIP Copper Scam, Says Italian Court

ऑगस्टा हेलिकॉप्टर व्यवहारात भारतीय अधिकाऱ्यांना लाच; राजकारण तापले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सन २०१० मध्ये भारताशी झालेल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाला होता, असा निकाल इटलीतील एका न्यायालयाने दिला अाणि भारतात राजकीय वातावरण तापले आहे. हवाई दलाचे तत्कालीन प्रमुख एस. पी. त्यागी यांनी तेव्हा लाच घेतली होती, असा स्पष्ट उल्लेख करून सिग्नोरा गांधींसह अनेक नावांचा निकालात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

संसदेत मंगळवारी हा मुद्दा उपस्थित झाला आणि काँग्रेसविरुद्ध भाजपला नवा मुद्दा सापडला. बुधवारी यावर भाजप नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. इटलीतील मिलान न्यायालयाच्या निकालाआधारे माध्यमांत ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर करारासंबंधी बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यानुसार, या व्यवहारात सुमारे ९.९७ अब्ज रुपये लाच म्हणून भारतीय अधिकाऱ्यांच्या खिशात गेले. विशेष म्हणजे निकालाच्या २२५ पानांपैकी १७ पाने एकट्या एस. पी. त्यागींबाबत आहेत.

सन २००५ ते २००७ या काळात त्यागी हवाई दलाचे प्रमुख होते. या काळात या करारास अंतिम रूप देण्यात आले. हा करार व्हावा म्हणून कंपनीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन् आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडेही लॉबिंग केले होते.

भाजपचे काँग्रेसला आव्हान : इटलीतील न्यायालयाच्या निकालानंतर दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी लाचखोरांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान दिले. दरम्यान, काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सोनिया गांधी व मनमोहनसिंग यांच्यावरील आरोप फेटाळले. ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टरसाठी ३,५६५ कोटी रुपयांचा हा करार झाला. यात मध्यस्थांना लाच दिल्याच्या आरोपानंतर सीबीआय व ईडीमार्फत याची चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात त्यागी कधीच इटलीतील कोर्टात हजर झालेले नाहीत. त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

निकालाचे मुख्य मुद्दे
> या प्रकरणातील मुख्य मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेल यांनी मार्च २००८ मध्ये ऑगस्टा वेस्टलँडच्या भारतातील प्रमुखांना पत्र लिहिले. यात सिग्नोरा गांधी यांची करारात मुख्य भूमिका असल्याचे म्हटले होते.
> ऑगस्टाचे माजी सीईओ गियोसेप्पी ओरसी यांनी एका पत्रात म्हटले होते की, इटलीचे पंतप्रधान किंवा ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घ्यायला हवी.
> दोन मध्यस्थांच्या पत्रव्यवहारात हवाई दलाचे अधिकारी व नेत्यांना द्यावयाच्या लाचेबाबत उल्लेख आहे. यात सोनिया गांधी यांचे विश्वासू अहमद पटेल यांच्यासाठी "एपी' आणि हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी यांच्या कुटुंबीयांसाठी "एफएएम' (फॅमिली ऑफ एअर मार्शल) असा उल्लेख.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, त्‍यागी यांच्‍यावर नेमके काय आरोप आहेत ?