आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र, मुंबईचा विजय; विदर्भ, झारखंड पराभूत विजय हजारे ट्राॅफी; पंजाबची विदर्भावर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबई, महाराष्ट्राने विजय हजारे ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय संपादन केले. दुसरीकडे विदर्भ अाणि झारखंडला पराभवाचा सामना करावा लागला. हरभजनच्या नेतृत्वात पंजाबने शनिवारी अ गटात विदर्भावर ६ गड्यांनी मात केली. कर्नाटकने धाेनीच्या झारखंडला ५ धावांनी हरवले. विदर्भाने  २१८ धावा काढल्या हाेत्या.
 
प्रत्युत्तरात पंजाबने ४१.३ षटकांत सामना जिंकला. मुंबईने  गुजरातला ९८ धावांनी हरवले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २७३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात गुजरातचा १७५ धावांत खुर्दा उडाला.  
 
झाेलच्या अर्धशतकाने महाराष्ट् विजयी : विजय झाेल (२) व  ऋतुराजच्या (१३२)बळावर महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर २५ धावांनी मात केली. जळगावच्या जगदीश झाेपे (४/६०) व  श्रीकांत मुंढेने (३/७५)  महाराष्ट्राला विजय मिळवून दिला.
बातम्या आणखी आहेत...