नवी दिल्ली- स्वातंत्र्य दिनी देशावर दहशतवादी हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे. दहशतवादी नवी दिल्ली-लाहोर फ्लाइट हायजॅक करून मोठा हल्ला करू शकतात. या कामात पॅराग्लाइडरची मदत घेऊ शकतात, अशी शक्यता सुरक्षा एजन्सीने वर्तवली आहे.
तसेच लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मक्बूल खान अतिरेकी हल्ला करू शकतो. त्याला पाकिस्तानी सेना आणि आयएसआय या हल्ल्यात मदत करण्याची शक्यता आहे, असा सतर्कतेचा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून सर्व राज्यांना देण्यात आलेला आहे.
मिळालेली माहिती अशी की, दहशतवादी भारतात घुसघोरी करण्यासाठी नेपाळ बॉर्डर अथवा नेपाळ-भारत एअर रूटचा आपर करू शकतात. या गुप्तचर यंत्रणे दिलेल्या इशार्यानंतर भारत-नेपाळ बॉर्डरवर एसएसबी आणि पाकिस्तानला लागून असलेल्या वेस्टर्न बॉर्डरवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ठिकठिकाणी बीएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय नौदर आणि हवाईदलाला सतर्क राहाण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान, उधमपूरमध्ये पकडण्यात आलेला दहशतवादी नावेदला राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकार्यांनी (एनआयए) दिल्लीला आणले आहे.
भाजप ऑफिस किंवा दि्ग्गज नेत्यावर होऊ शकतो हल्ला...
गुप्तचर यंत्रणेने दिलेली माहिती अशी की, दहशतवादी समुद्रमार्गे भारतात घुसून 26/11 सारखा मोठा घातपात करू शकतात. या पार्श्वभूमीवर कोस्टगार्ड आणि एअरफोर्सला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भाजप कार्यालयावर किंवा दिग्गज नेत्यावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वृत्ताला गृह मंत्रालयाने दुजोरा दिला आहे.