आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अजान’ महत्त्वाची लाऊडस्पीकर नव्हे, अहमद पटेल यांचे ट्विट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मशिदींत लाऊडस्पीकरवर होणाऱ्या अजानबाबत गायक सोनू निगमच्या आक्षेपाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार पटेल ट्विटरवर म्हणाले, अजान हा नमाजचा महत्त्वाचा भाग आहे, पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात लाऊडस्पीकरची गरज नाही.
 
सोनू निगम यांनी या मुद्द्यावर एकापाठोपाठ चार ट्विट्स केले होते. त्यावरून सोशल मीडियावर या चर्चेला ताेंड फुटले होते. शेवटच्या ट्विटमध्ये तर त्यांनी ही गुंडगिरी असल्याचे म्हटले होते. यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती.
बातम्या आणखी आहेत...