आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AIIMS मधील डॉक्टर प्रियाची आत्महत्या, पतीवर केला समलैंगिक असल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील एका डॉक्टरने तिचा पती समलैंगिक असल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. डॉ. प्रिया वेदीचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये आढळून आला आहे. डॉक्टरचे पती कमल वेदी याला अटक करण्यात आली आहे.
31 वर्षीय डॉ. प्रियाचा मृतदेह दिल्लीतील पहाडगंज भागातील एका हॉटेलमध्ये आढळला. त्यांनी हाताच्या नस कापून घेतल्या होत्या. पोलिसांचे म्हणणे आहे, की प्रिया यांनी शनिवारी रात्री साधारण पावणेबारा वाजता हॉटेलमध्ये चेक इन केले. ज्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळला आहे तिथे एक सुसाइड नोट देखील सापडली. त्यात लिहिले आहे, की पतीने शारीरिक आणि मानसिक छळ केला. प्रिया यांनी मृत्यूच्या दिवशी फेसबुकवर एक पोस्ट देखील अपडेट केली होती. त्यात तिने पतीवर समलैंगिक असल्याचा आरोप केला होता. त्यांनी लिहिले होते, की पतीने मला अंधारात ठेवले. तो माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता.
डॉ. प्रिया आणि आरोपी दोघेही एम्समध्ये निवासी डॉक्टर होते. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती.
पुढील स्लाइडवर वाचा, डॉ. प्रिया वेदींनी फेसबुकवर काय लिहिले....