आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शनामुळे रुग्णांचा त्रास कसा कमी होतो; शास्त्रज्ञ बालाजीवर संशोधन करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील मेहंदीपूर येथील बालाजी मंदिरात अंगार्‍या-धुपार्‍याने रुग्णांचा आजार कसा बरा होतो, बालाजीच्या दर्शनामुळे रुग्णाचा त्रास कसा कमी होतो, हे कोडे उलगडण्यासाठी दिल्ली विद्यापीठ, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नेदरलँडचे (हॉलंड) शास्त्रज्ञ, प्रोफेसर आणि विद्यार्थी संशोधन करणार आहेत.
इंडो-जर्मन योजनेअंतर्गत हे संशोधन केले जाणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी काही विद्यार्थ्यांना मेहंदीपूर येथील बालाजी मंदिराची पाहणी करण्यासाठी पाठवले असल्याची माहिती दिल्ली विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागातील वरिष्ठ प्रो. पी.सी.जोशी यांनी दिली.

10 कोटींमध्ये 10 लाख मानसिक रुग्ण

प्रो. जोशी म्हणाले, या संशोधनामध्ये आपण स्वत: तसेच वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आर. चढ्ढा, जर्मनीचे प्रो. विल्यम्स सॅक्स, नेदरलँडचे प्रो. पी.ई. डांग यांचा समावेश आहे. मानसोपचारतज्ज्ञ व शास्त्रज्ञांच्या पथकामध्ये संबंधित संस्थांतील विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. 1 कोटी लोकसंख्येमध्ये साधारण 10 लाख नागरिकांना सामाजिक कारणांमुळे मानसिक आजार जडतो.

आजाराचे अचूक निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे पुरेसा वेळही नसतो. त्यामुळे अंगाºया-धुपाºयाचा इलाज शोधतात व बालाजीच्या दर्शनासाठी येतात. सामाजिक कारणांमुळे होणार्‍यामानसिक आजारावर कशा पद्धतीने इलाज केला जातो, हे संशोधनातून पाहिले जाणार आहे. मंदिरामध्ये केले जाणारे कर्मकांड हे शास्त्रीय उपचार पद्धतीसारखेच आहे. काही रुग्णांच्या मेंदूमध्ये रासायनिक असंतुलन निर्माण झाल्यामुळे त्यांना मानसिक आजार जडतो. या रुग्णांचे औषधोपचाराद्वारे संतुलन राखले जाते. पारंपरिक समज व श्रद्धेसाठी हे संशोधन उपयोगी ठरेल.