आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषामुळे झाला होता सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू, एम्सच्या डॉक्टरांनी पोलिसांत सादर केला रिपोर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूबाबत एम्सच्या डॉक्टरांनी नवा अहवाल पोलिसांना सादर केला आहे. मात्र या नव्या रिपोर्टमध्ये जुनीच तथ्ये आहेत. ती म्हणजे सुनंदा यांचा मृत्यू हा विषामुळे झाला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनंदा यांचे पोस्टमॉर्टम करणा-या तीन सदस्यांच्या डॉक्टरांच्या टीमनेच हा अहवालही तयार केला आहे. सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅब (सीएफएसएल) च्या निष्कर्षांच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. सीएफएसएलने सुनंदा यांच्या विसेराची तपासणी केली होती. टीमने या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, सुनंदा यांची किडनी, लिव्हर आणि दिल हृदय सामान्य होते. मृत्यू विषामुळे झाला.

मार्चमध्ये सीएफएसएलच्या विसेरा रिपोर्टमध्ये औषधातून विष शरिरात गेले असल्याचे संकेत मिळाले होते. पण पोलिस तेवढ्याने समाधानी नव्हते. त्यांनी एम्सला पुन्हा अभ्यास करून रिपोर्ट देण्यास सांगितले होते. सुनंदा या 17 जानेवारीला एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या होत्या.

पुढे पाहा, सुनंदा पुष्कर यांचा नवा अटॉप्सी रिपोर्ट...