आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट नोटीसवरही एअरफोर्स पूर्ण ताकदीने युद्धासाठी सज्ज - एअर चीफ मार्शल धनोआ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या अस्त्रांना लोकेट करण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. - Divya Marathi
पाकिस्तानच्या अस्त्रांना लोकेट करण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता आमच्याकडे आहे.
नवी दिल्ली - युद्ध झालेच तर एअरफोर्स कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. शॉर्टनोटीसरही एअरफोर्स युद्धासाठी सज्ज असेल असे एअरफोर्स चीफ मार्शल  बी.एस. धनोआ यांनी म्हटले आहे. भूदल आणि नौदलाचीकही मदत घेतली जाईल असेही धनोआ म्हणाले. चीन आणि पाकिस्तानसंबंधीच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिले. चुम्बी व्हॅली येथे अजूनही चीनी फौजा तैनात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आम्हाला विश्वास आहे की त्यांचा युद्धाभ्यास संपल्यानंतर ते माघारी फिरतील. 
 
महिला फायटर पायलट डिसेंबरमध्ये 
- एअर चीफ म्हणाले, एअरफोर्समध्ये पहिल्या तीन महिला फायटर पायलट्सना यावर्षी डिसेंबरमध्ये कमीशन मिळेल. गेल्यावर्षी एअरफोर्समध्ये महिला फायटर पायलट सहभागी करुन घेण्यासाठी परवानगी मिळाली होती. 
- एका प्रश्नाच्या उत्तरात धनोआ म्हणाले, 'दोन मोर्चांवरील युद्धासाठी आम्हाला 42 स्क्वॉड्रन्सची गरज आहे.'
 
नक्षलवादाविरोधात एअरफोर्सचा वापर नाही 
- नक्षलवादाविरोधात एअरफोर्सचा वापर करता येईला का, या प्रश्नाला उत्तर देताना धनोआ म्हणाले, आम्ही आमच्या शक्तीचावापर स्वकीयांविरोधात करणार नाही. त्रिवेणी येथे नक्षलींविरोधात सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये एअरफोर्स ट्रान्सपोर्टेशनसाठी मदत करत आहे. 
- चुम्ही व्हॅली येथे चीनी सैन्य असल्याच्या प्रश्नावर एअर चीफ म्हणाले, हे खरे आहे. तिथे चीनी फौजा आहे. मात्र आम्हाला आशा आहे की त्यांचा युद्धाभ्यास पूर्ण झाल्यानंतर ते माघारी परत जातील. 
 
पाकिस्तानवर काय म्हणाले ? 
- पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबद्ल त्यांना विचारण्यात आले. त्यावर धनोआ म्हणाले, 'पाकिस्तानच्या या अस्त्रांना लोकेट करण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. आम्ही शॉर्ट नोटीसवरही युद्धासाठी सज्ज आहोत. यात आम्हाला आमच्या सहकारी दोन्ही दलांची (भूदल आणि नौदल) मदत मिळेल. आमच्या फोर्समधील पुरुष आणि महिला सैनिक कोणत्याही परिस्थितीत उत्तर देण्यासाठी तयार आहेत.'
बातम्या आणखी आहेत...