आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एअरफोर्सचे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशात क्रॅश, 5 ठार, एक जण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एअरफोर्सचे Mi-17 V5 हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशात कोसळले. यात 6 जण होते. पाच जणांचा यात मृत्यू झाला असून एक जखमी आहे. ही घटना तवांग जवळ घडली आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी 6 वाजता हेलिकॉप्टरने एअर मेंटनेन्ससाठी उड्डाण केले होते. एअरफोर्सने या दुर्घटनेनंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. 
 
याआधीही झाले Mi-17 V5 ची दुर्घटना 
- जून 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये पुरग्रस्तांना मदत कार्य करत असताना Mi-17 V5 हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यात 20 जणांचा मृत्यू झाला होता. 
- ऑक्टोबर 2016 मध्ये बद्रीनाथ जवळील भागातून टेक ऑफ करताना Mi-17 V5 हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नव्हती. हे हेलिकॉप्टर आर्मीचे कमाऊं रेजिमेंट वापरत होते. 
 
जगातील सर्वोत्कृष्ट हेलिकॉप्टरमध्ये Mi-17 V5
- Mi-17 V5 हे जगातील सर्वाधिक अत्याधुनिक मिलिटरी ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर समजले जाते. 
- 2008 मध्ये रोसोबोरोन एक्सपोर्टने भारताला 80 Mi-17 V5 हेलिकॉप्टर सप्लाय करणार असल्याचा करार केला होता.   
 
 
बातम्या आणखी आहेत...