आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियाच्या विमानाचे शेपूट रनवेवर आदळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबई विमानतळावर लँडिंगच्या वेळी एअर इंडियाच्या विमानाचा मागचा भाग रनवेवर आदळला होता. मंगलोरहून आलेल्या या विमानात १९४ प्रवासी होते. ही घटना रविवारची आहे. मंगळवारी दोन वैमानिकांना ड्यूटीवरून हटवल्यानंतर ती उघडकीस आली.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, नागरी उड्डयन विभागाचे महासंचालक या प्रकरणाची चौकशी करत आहेत. एअर इंडियाही अंतर्गत चौकशी करत आहे. घटनेनंतर एअर इंडियाने त्या विमानाचे उड्डाणही बंद केले आहे.