आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी विमान उड्डाण क्षेत्रात वाढताहेत नोकऱ्या, पण स्पर्धादेखील अधिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या तीन-चार वर्षांमध्ये मंदीनंतर देशातील नागरी विमान उड्डाण क्षेत्राची स्थिती आता सुधारत आहे. अनेक नव्या एअरलाइन कंपन्या सुरू होणार आहेत. या कंपन्या मोठ्या प्रमाणावर नियुक्त्यांची तयारी करत आहेत. या उद्योगात नोकऱ्यांच्या संधी वाढत आहेत; पण स्पर्धाही अधिक आहे.
देशातील नागरी विमान उड्डाण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत तेजी आल्यामुळे नोकऱ्यांच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. अनेक कंपन्या पुढील वर्षात नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना बनवत आहेत. यात इंडिगो, जेट एअरवेज, एअर इंडिया आणि स्पाइस जेटसारख्या मोठ्या कंपन्यादेखील सहभागी आहेत. या उद्योगात एअरक्राफ्ट ऑपरेशन्स, एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट, फ्लाइंग ऑपरेशन आणि टेक्निकल ऑपरेशनमध्ये करिअर बनवू शकतो.
२०२० पर्यंत तिसरी सर्वाधिक मोठी नागरी विमानोड्डाणाची बाजारपेठ असेल भारत : भारत सध्या जगातील नववी सर्वाधिक मोठी नागरी विमान उड्डाण क्षेत्रातील बाजारपेठ आहे आणि याची बाजारपेठ क्षमता (उलाढाल) १६ अब्ज डॉलरची आहे. अहवालानुसार देशातील सिव्हिल एव्हिएशन मार्केट (नागरी विमान उड्डाण बाजारपेठ) २०२० पर्यंत जगातील तिसरी आणि २०३० पर्यंत जगभरातील सर्वात मोठी बाजारपेठ असेल होईल. देशातील एव्हिएशन इंडस्ट्रीत लो कॉस्ट करिअर, देशांतर्गत एअरलाइन्समध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, अत्याधुनिक तंत्रज्ञानासारख्या विकासाच्या शक्यता वाढल्या आहेत. गेल्या वर्षी देशातील डोमेस्टिक (देशांतर्गत-घरगुती) एअर पॅसेंजर ट्रॅफिक ७० लाखांच्या जवळपास होती. जी मेमध्ये २०१६ मध्ये ८.६७ टक्के वाढून ८६ लाख झाली. तीच २०१४-१५ मध्ये एकूण हवाई प्रवासी वाहतूक जवळपास ७ कोटी होती, जी २०१५-१६ मध्ये २१.३ टक्के वाढून जवळपास ८.५ कोटी झाली. मार्च, २०१६ मध्ये सर्व विमानतळावर एअरक्राफ्ट मूव्हमेंट १ लाख ६० हजार ८३० एवढी विक्रमी नोंद केली गेली. जी २०१५ च्या अपेक्षेत १४.९ टक्के अधिक आहे. यादरम्यान देशातील देशांतर्गत एअरक्राफ्ट मूव्हमेंटमध्ये १०.५ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशनच्या अहवालानुसार भारतात २०१७ पर्यंत डोमेस्टिक एअर ट्रॅफिक १० कोटी हवाई प्रवाशांची होईल. तांत्रिक आणि अतांत्रिक शाखेतील नोकऱ्यांच्या संधी : गणित आणि रसायनशास्त्रासह बारावी आवश्यक आहे. विद्यार्थी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगमध्ये करिअरसाठी संबंधित शाखेतील पदवी कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. याशिवाय एव्हिएशन सेफ्टी ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर कोर्स, फ्लाइट अटेंडंट कोर्स, कमर्शियल पायलट वा हवाई वाहतूक नियंत्रक या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. याशिवाय एअर होस्टेस, कस्टमर केअर, टिकेटिंगपासून ते कमर्शियल पायलट, ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह, एअरोस्पेस इंजिनिअरिंग आणि केबिन क्रूमध्ये करिअर करू शकता. तथापि, पायलट आणि एअर होस्टेससारख्या पदांसाठी स्पर्धा प्रचंड आहे. आणि प्रत्येक पदासाठी सरासरी ५० हून अधिक अर्जदार असतात.
दुसऱ्या क्षेत्रापेक्षा अधिक उत्पन्न : या क्षेत्रात उत्पन्नदेखील अन्य क्षेत्रांच्या तुलनेत उत्तम असते. टेक्निकल विभाग आणि व्यावसायिक वैमानिकासाठी प्रारंभीचे पॅकेज ४० हजार रु. प्रतिमाहपर्यंत असू शकते. याशिवाय अन्य पदांसाठी वेतन २० ते २५ हजार रु. प्रतिमाहपर्यंत होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...