आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air India Flight Co Pilot Beats Up Air Commander Inside Cockpit News In Marathi

Air India: कॉकपिटमध्येच वैमानिक-सहवैमानिकाचे \'दे दणादण\'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एअर इंडियाच्या एका विमानात कॉकपिटमध्ये वैमानिक आणि सहवैमानिकाची फ्री स्टाइल झाल्याची घटना समोर आली आहे. सहवैमानिकाने वैमानिकाला बेदम मारहाण केली. परंतु, दोन्ही अधिकार्‍यांमध्ये फक्त बाचाबाची झाल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. जयपूर- दिल्ली विमानात हा प्रकार झाला.
एअर इंडियाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विमान उड्डान घेण्यापूर्वी आवश्यक माहिती नोंदवून घेतली जात असते. माहिती नोंदवण्याची जबाबदारी सहवैमानिकाची असते. प्रवाशांची संख्या, टेक-ऑफची वेळ आणि विमानाचे वजन आदी माहिती नोंदवून घेतली जाते. मुख्य वैमानिकाने सहवैमानिकाला माहिती नोंदवून घेण्याचे निर्देश दिले. परंतु, सहवैमानिक अचानक संतापला आणि त्याने कॉकपिटमध्ये वैमानिकाला जबर मारहाण केली. मात्र, हा प्रकार झाल्यानंतरही वैमानिकाने उड्डान घेण्याचा निर्णय घेतल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, एअर इंडियाच्या दोन्ही वैमानिकाची नावे समजू शकली नाही. या सहवैैमानिकाने यापूर्वी अनेकादा मारहाणीचे प्रकार केले आहेत. तीन वर्षांपूर्वी याच सहवैमानिकाने एका वैमानिकाला कॉकपिटबाहेर बोलवून त्याच्या शर्टच्या कॉलरवरील स्टार काढून त्याला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी या सहवैमानिकाविरुद्ध तक्रार दाखल करण्‍यात आली होती.