आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air India Flyers Must Report To Airport 3 Hours Early Terror Alert

टेरर अलर्ट: तीन तास आधीच एअरपोर्टवर करा रिपोर्ट, Air Indiaच्या प्रवाशांना सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पठानकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगण्यात येत आहे. एअर इंडियाने प्रवाशांच्या सामानाची तपासणी मोहीम वाढवली आहे. प्रवाशांनी फ्लाइटच्या वेळेच्या तीन तास आधीच एअरपोर्टवर रिपोर्ट करावा, अशा सूचना प्रवाशांना देण्यात आल्या आहे.

Air India ने प्रवाशांना केले आवाहन...
- देशभरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अलर्ट जारी करण्‍यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने आपल्या प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी सुरु केली आहे.
- यामुळे फ्लाइटला विलंब होण्याची शक्यता आहे.
- यासाठी प्रवाशांनी तीन तास आधीच एअरपोर्टवर रिपोर्ट करावे.

चेक-इनचे नियम काय?
- डोमेस्टिक फ्लाइटसाठी 75 मिनिटांआधी चेक इन
- इंटरनॅशनल फ्लाइटसाठी अडीच तास आधी चेक इन

प्रायव्हेट एअरलाइन्सची काय भूमिका?
- देशातील प्रायव्हेट एअरलाइन्सने अद्याप यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.
- मीडिया रिपोर्टनुसार, काही एअरलाइन्सच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रवाशांना फ्लाइटच्या निर्धारित वेळेच्या आधी रिपोर्ट करण्‍यास सांगितले आहे. प्रवाशांना असुविधा होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
- ही व्यवस्था प्रजासत्तक दिनापर्यंत (26 जानेवारी) राहाणार आहे.