आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराजाचा बँडबाजा: केंद्रीय मंत्री अशोक गजपतींची कबुली, एअर इंडिया आर्थिक संकटात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एअर इंडिया पुन्हा एकदा प्रचंड आर्थिक तोट्यात आहे. नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी एअर इंडियाच्या संकटावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एअर इंडियाचे आर्थिक संकट आम्हाला वारसा रूपाने मिळाले आहे; परंतु कर्मचाऱ्यांनी मिळून काम करून व इतर उपाययोजना करून कंपनीला बाहेर काढावे लागेल, असे राजू म्हणाले.

राजू म्हणाले, "एअर इंडियाचे अार्थिक संकट चिंताजनक आहे. ५/२० हा नियम एअर इंडियासाठी गळफास ठरला आहे. त्यापासून दिलासा मिळाला पाहिजे, असे मला वाटते. परंतु दुर्दैवाने तो आधीच्या कॅबिनेटचा निर्णय होता. त्यासंदर्भात फायलीमध्ये देण्यात आलेले तर्क व कॅबिनेट नोट हास्यास्पद आहेत.' नियम ५/२० हा एअरलाइन्सच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांशी संबंधित आहे. याबाबतची मंजुरी तेव्हाच दिली जाते, जेव्हा कमीत कमी पाच वर्षे देशांतर्गत विमान उड्डाणाचा अनुभव असेल. तसेच कंपनीकडे २० विमाने आहेत. सरकार हा नियम बदलण्याच्या तयारीत आहे.

कारण यामुळे सरकारला कंपनीकडून अपेक्षित असलेला महसूल मिळेनासा झाला आहे. उत्पन्नात घट झाल्याने एअर इंडियाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास अडचणी येत आहेत. अर्थात, युद्धग्रस्त देशांमधून भारतीयांची सुरक्षित सुटका करण्याच्या मोहिमेत दिलेल्या योगदानाबद्दल राजू यांनी एअर इंडियाचे कौतुक केले.

कंपनी यामुळे अडचणीत
-२००१-२००६ पर्यंत नफा; परंतु २००६-२००७ मध्ये ७७० कोटी रुपये तोटा
-२००९ मध्ये दोन विमाने विकावे लागली. यातून १०० कोटी रुपये मिळाले.
-२७ फेब्रुवारी २०११ रोजी एअर इंडिया - इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण. त्यामुळेच तोटा वाढला. एकूण तोटा ७,२०० कोटी झाला.
-८ मे २०१२ मध्ये समान वेतन, सुविधांच्या मागणीसाठी पायलट सुटीवर गेले. १६० पायलट ड्यूटीवर आले नाहीत.
-एअर इंडियाने न्यायालयात आश्वासन दिल्यानंतर ५८ दिवसांचा संप मिटला; पण त्यामुळे ५०० कोटींचे नुकसान झाले.
-कॅगने २०१४ मध्ये १११ नवी विमाने खरेदीचा निर्णय संकटाचे सर्वात मोठे कारण असल्याचे ताशेरे ओढले.
-एअर इंडियाला आता बेलआऊट पॅकेजची अपेक्षा आहे. यूपीए सरकारने एप्रिल २०१२ मध्ये ३०,२३१ कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते; परंतु कंपनीवर अद्याप ४०,००० कोटींचे कर्ज आहे.
-एअर इंडियाला आता बेलआऊट पॅकेजची अपेक्षा आहे. यूपीए सरकारने एप्रिल २०१२ मध्ये ३०,२३१ कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते; परंतु कंपनीवर अद्याप ४०,००० कोटींचे कर्ज आहे.
-वार्षिक ७००० कोटी व एकूण ४९,००० कोटींचा तोटा. इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत तो १० टक्के आहे.
-८० % तोटा आंतरराष्ट्रीय मार्गांवर. तीन देशांतर्गत व पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा खर्चही निघत नाही.
-६० आंतरराष्ट्रीय उड्डाणांतून केवळ इंधनाचा खर्चच वसूल.
-ज्या कामांसाठी कर्मचाऱ्यांवर खर्च केला जात आहे, त्यांना इतर एअरलाइन्स कंपन्यांकडे आऊटसोर्स करून बचत.
- एका विमानावर २१४ कर्मचारी. त्यापेक्षा जास्त केवळ मलेशियन एअरलाइन्स (२३०), व्हर्जिन अटलांटिका (२८२), केएलएम डच (२२०) मध्ये आहेत.
आनंद फार काळ टिकला नाही : डिसेंबर २०१४ मध्ये एअर इंडियाला १४.६ कोटींचा शुद्ध नफा झाला; परंतु परिस्थिती सुधारली नाही. कारण आधीच्या वर्षी डिसेंबर २०१३ मध्ये १६८.७ कोटी रुपये तोटा झाला होता.