आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1777 रुपयांत Air India घडवणार हवाई सफर, आजपासून बुकींग सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खासगी विमान कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्वस्त विमान प्रवासाच्या स्पर्धेमध्ये आता सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाही उतरत असल्याचे दिसते आहे. एअर इंडियाने मान्सून सेल योजनेच्या अंतर्गत अवघ्या 1777 रुपयांत विमान प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील 66 ठिकाणांसाठी ही सेवा दिली जाणार आहे. या भाड्यामध्येच सर्व करांचाही समावेश असणार आहे. जेट एअरवेज, स्पाइसजेट, इंडिगो, एअर एशिया असा कंपन्यांनी यापूर्वीच अशा प्रकारे स्वस्त दरांच्या विविध ऑफर्स दिल्या आहेत.

एअर इंडियाच्या ऑफरमधील महत्त्वाच्या बाबी
- 1777 रुपये प्रारंभिक भाडे
- 66 ठिकाणांसाठी केली जाणार बुकींग. (रूट जाणून घेण्यासाठी याठिकाणी क्लिक करा)
- 10 ते 12 जून दरम्यान बुकींग करता येणार.
- 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान करता येईल प्रवास.
- www.airindia.in, टोल फ्री नंबर 18001801407 किंवा मान्यता असलेल्या ट्रॅव्हल एजंटद्वारेही करता येईल बुकींग.