आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर मार्शल अर्जन सिंह यांनी 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 5 स्टार मिळवणारे एकमेव अधिकारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- १९६५ च्या युद्धात मोलाची भूमिका बजावणारे व वायुदलाचे एकमेव मार्शल अर्जनसिंह (९८) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. संध्याकाळी ७.३० वा. त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या प्रकृतीची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि वायुदलप्रमुख बी.एस. धनोआ यांनी शनिवारी रुग्णालयात भेट घेतली होती.
 
अर्जन सिंह हे पाच स्टार मिळवणारे भारतीय वायुदलाचे एकमेव अधिकारी होते. 1965 मध्ये त्यांनी वयाच्या 45 व्या वर्षी सर्वात तरुण वायुसेना प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांना दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेतली. मार्शल अर्जुनसिंग वयाच्या फक्त 44व्या वर्षी एअरफोर्स चीफ झाले होते. स्वंतत्र भारताच्या पहिल्या लढाईत एअरफोर्सने कमान सांभाळली होती तेव्हा अर्जुनसिंग हे एअरफोर्सचे प्रमुख होते. भारताच्या तिन्ही सैन्य दलांमध्ये 5 स्टार रँक मिळवण्याचा गौरव आतापर्यंत तीन अधिकाऱ्यांना मिळाला आहे. त्यापैकी अर्जुनसिंग एक आहे. 
 
मार्शल अर्जन सिंह  5 स्टार रँक चे एकमेव ऑफिसर   
वयाच्‍या 45 व्‍या वर्षी मार्शल अर्जन सिंह एयरफोर्स चीफ बनले होते. पाकिस्‍तान विरोधात लढल्‍या गेलेल्‍या 1965 च्‍या युध्‍दावेळी एयरफोर्सची कमान त्‍यांच्‍या हातात होती. तिन्‍ही सेनेमध्‍ये 5 स्टार रँक मिळवण्‍याचा गौरव फक्‍त तीनच अधिकाऱ्यांना मिळालेला आहे आणि त्‍यापैकी अर्जन सिंह हे एक होते. फील्ड मार्शल मानिक शॉ, केएम करियप्पा, अर्जन सिंह या तिघांनाच हा बहुमान मिळालेला होता. 2002 मध्‍ये अर्जुन सिंह यांची 5 स्टार रँकसाठी निवड झाली होती. अर्जन सिंह पाकिस्‍तानातील फैसलाबाद येथे 15 एप्रिल 1919 ला त्‍यांचा जन्‍म झाला होता. 
 
मार्शल कधीच निवृत्त होत नाही... 
- देशामध्ये आतापर्यंत एअर मार्शल अर्जुनसिंग, फिल्ड मार्शल मानिक शॉ आणि के.एम.करिअप्पा यांना 5 स्टार रँक मिळाली होती. मार्शल हे कधीच निवृत्त होत नाहीत. 
- अर्जुनसिंग यांना 2002 मध्ये 5 स्टार रँक मिळाली होती. 
- त्यांचा जन्म 15 एप्रिल 1919 मध्ये आताच्या पाकिस्तानमधील फैसलाबाद येथे झाला होता. ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत. 
 
व्हिल चेअरवर आले आणि उभे राहून कलामांना केला सॅल्यूट 
- माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे 27 जुलै 2015 रोजी निधन झाले. त्यांचे पार्थीव दिल्लीतील पालम एअरपोर्टवर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेव्हा कलमांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या योद्धा अर्जुनसिंग यांच्यावर. ते व्हिल चेअरवरुन आले होते, मात्र त्यांनी उभे राहून कलामांना थरथरत्या हातांनी सॅल्यूट केला होता.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, डॉ. कलामांना सॅल्यूट करताना एअर मार्शल अर्जुनसिंग... 
बातम्या आणखी आहेत...