आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रेडिओच्‍या बातम्‍या मिळणार एसएमएसवर, लवकरच सुरु होणार सेवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- बदलत्‍या तंत्रज्ञानासोबतच काळाची गरज ओळखून 'ऑल इंडिया रेडिओ'देखील कात टाकणार आहे. 'एअर'वर प्रसारित होणा-या बातम्‍या आता एसएमएसद्वारे थेट मोबाईलवरही मिळणार आहेत. यासाठी एसएमएस सेवा लवरकच सुरु करण्‍यात येणार आहे.

'एअर'च्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एसएमएस सेवेसाठी नोंदणी केलेल्‍या मोबाईधारकांना दिवसातून 3 वेळा महत्त्वाच्‍या बातम्‍यांचे एसएमएस पाठविण्‍यात येतील. प्रत्‍येक एसएमएसमध्‍ये 3-4 महत्त्वाच्‍या बातम्‍यांचे शीर्षक असतील. प्रत्‍येक एसएमएसमध्‍ये 100 अक्षरे बातम्‍यांसंदर्भात राहतील. तसेच उर्वरीत 60 अक्षरांचा वापर जाहिरातींसाठी करण्‍यात येईल. जाहिरातींच्‍या माध्‍यमातून उत्‍पन्न मिळेल. एक एसएमएस 160 अक्षरांचा असतो.

नोंदणीकृत मोबाईलधाराकांची माहिती ठेवण्‍यासाठी एका स्‍वतंत्र यंत्रणेची गरज असते. त्‍यादृष्‍टीने तयारी सुरु करण्‍यात आली आहे. यासाठी खासगी कंपनीची सेवा घेण्‍यात येईल, अशी माहिती 'एअर'च्‍या अधिका-यांनी दिली.