आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#OddEven: घट नाहीच प्रदूषण वाढले, आता सरकार तंदूरवर बंदी आणणार ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - वातावरणातील प्रदूषण कमी करण्‍यासाठी दिल्‍ली सरकारने प्रायोगिक तत्‍त्‍वावर 15 दिवसांसाठी सम-विषय योजना लागू केली होती. या काळात वाहतूक कोंडीपासून दिल्‍लीकरांना मुक्‍ती मिळाली. मात्र, प्रदूषण कमी होण्‍याऐवजी वाढले. आकडेवारीनुसार, योजनेदरम्‍यान हवेची गुणवत्‍ता खूप खराब होती. दरम्‍यान, जानेवारीच्‍या पहिल्‍या आठवड्याच्‍या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात प्रदूषण कमी झाले. ट्रायल संपताच सोमवारी दिल्लीच्‍या रस्‍त्‍यांवर वाहनांची मोठी गर्दी झाल्‍याने वाहतुकीची कोंडी झाली होती.
किती वाढले प्रदूषण आणि कुणी केली पाहणी...
- वेब पोर्टल इंडिया स्पेंडच्‍या सर्वेनुसार, ऑड-ईव्‍हनच्‍या 15 दिवसांत दिल्‍लीचे प्रदूषण डिसेंबरच्‍या शेवटच्‍या पंधरवड्यापेक्षा 15 टक्‍के वाढले.
- ऑड-ईव्‍हन ट्रायलदरम्‍यान PM2.5 चे सरासरी कंसन्ट्रेशन 309 होते. उलट ट्रायलच्‍या 15 दिवसांपूर्वी त्‍याची सरासरी 270 एवढी होती.
- 2.5 मायक्रोमीटरपेक्षा कमी (केसांचा व्यास 70मायक्रोमीटर असतो) सूक्ष्म धूलिकणांचीच संख्या प्रचंड वाढली आहे. एका घनफूटात या सूक्ष्मकणांची संख्या 100 मायक्रोग्रॅमपेक्षा कमी असणे अपेक्षित असते.
- हे कण फुफ्फुस आणि रक्त प्रवाहात अडथळे निर्माण करतात.
ट्रायल संपताच दिल्लीत वाहनांची कोंडी
- ऑड-ईव्‍हन ट्रायल संपली. त्‍या नंतर रस्‍त्‍यांवर वाहनांची कोंडी पाहायला मिळाली.
- प्रजासत्‍ताक दिनी होणाऱ्या परेडची तालीमसुद्धा याचे कारण आहे. यामुळे राजपथवर विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत वाहनांची कोंडी होत आहे.
- बीआरटी कॉरीडोर आणि मथुरा रोडवरसुद्धा मोठी कोंडी होत आहे.

विकली सर्वेत दिलासा
- डाटाच्‍या विकली अॅनालिसिसमध्‍ये दिलासा मिळाला आहे. जानेवारीच्‍या पहिल्‍या आठवड्याच्‍या तुलनेत दुसऱ्या आठवड्यामध्‍ये PM2.5 चा स्‍तर 37 टक्‍के कमी झाला.
आता तंदूरवर बॅन लावण्‍याची तयारी....
- आयआयटी कानपूरच्‍या एक सर्वेनुसार, दिल्लीतील हॉटल आणि रेस्टोरेंट्समध्‍ये तंदूर रोटी शेकण्‍यासाठी कोळसा जाळल्‍या जातो. त्‍यामुळे प्रदूषण वाढते.
- दिल्लीत एकूण 36000 हॉटल आणि रेस्टोरेंट आहेत. यात तंदूर रोटीसाठी नऊ हजारांपेक्षा अधिक कोळशांचा वापर केला जातो.
- यामुळे दिल्‍लीच्‍या हवेत 37,171 kg PM10 प्रदूषण होते.
- त्‍यामुळे आता दिल्‍ली सरकार तंदूरवर बंदी आणेल का, अशी चर्चा होत आहे.