आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Airbase Attack: NSG Saved Strategic Assets Of The Air Force

पठाणकोट हल्ला: मोर्चा सांभाळण्यास गेलेल्या NSG ला माहितच नव्हते दहशतवाद्यांचे लोकेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट एअरफोर्समध्ये दाखल झालेली एनएसजी टीम - Divya Marathi
पठाणकोट एअरफोर्समध्ये दाखल झालेली एनएसजी टीम
नवी दिल्ली - या वर्षाच्या सुरुवातीला पठाणकोट एअरबेसवर झालेल्या हल्ल्यादरम्यान जेव्हा 'एनएसजी'ची टीम दहशतवाद्यांसोबत मुकाबला करण्यासाठी पोहोचली तेव्हा त्यांना शत्रुच्या लोकेशनचा पत्ताच नव्हता. त्यांचे पहिले लक्ष्य होते एअरफोर्समधील जेट फायटर्स आणि इतर मौल्यवान वस्तूंचा बचाव करणे.

एनएसजीच्या महासंचालकांनी ऑपेरशनबद्दल काय सांगितले
- एनएसजी महासंचालक आर.सी.तायल यांनी सांगितले, की एनएसजीने मुंबईतील 26/11 हल्ल्यावेळी केलेल्या कारवाईपेक्षा आता अधिक गतिमान कारवाई केली.
- महासंचालकांच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ स्तरावर घेतल्या गेलेल्या जलद निर्णयांमुळे एअरफोर्समधील सर्वात महत्त्वाचे फायटर जेट्स आणि इतर मौल्यवान सामुग्री वाचवण्यात यश आले.

आणखी काय म्हणाले तायल
इंग्रजी दैनिकाशी केलेल्या बातचीतमध्ये तायल म्हणाले, एअरफोर्स, एनएसजी आणि आर्मी यांच्यात कमांड कंट्रोलवरुन कुठेही समन्वयाचा आभाव नव्हता.
तायल म्हणाले, '1 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आम्हाला अलर्ट मिळाला. 7 वाजता निश्चित झाले की या ऑपरेशनवर एनएसजी जाणार, त्यानंतर 10.15 वाजता टीम एअरफोर्सच्या आत दाखल झाली होती.'

इंग्रजी दैनिकाने एनएसजी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की सुरक्षा यंत्रणांनी एनएसजीला फक्त एवढेच सांगितले होते, की पठाणकोटवर दहशतवादी हल्ला झाला आहे. टारगेटबद्दल काहीच सांगण्यात आले नव्हते.

- सूत्र म्हणाले, एनएसजी टीम बाहेरूनच लढण्याच्या तयारीने गेली होती, मात्र नंतर कळाले की चार दहशतवादी एअरफोर्सच्या आतमध्ये घुसले आहेत.

टीममध्ये किती कमांडो होते
- एनएसजीच्या टीममध्ये 300 कमांडो होते. त्यांना दिल्लीहून बोलावण्यात आले होते. त्यांच्या तीन टीम होत्या.
- जेव्हा माहित पडले की दहशतवादी एअरफोर्सच्या आतमध्ये आहे, तेव्हा दोन टीम आत गेल्या आणि एका टीमने बाहेर मोर्चा सांभाळला.
- एअरबेसमध्ये गेलेल्या दोन टीमपैकी एका टीमने एअरफोर्सच्या मालमत्तेचे रक्षण केले तर दुसऱ्या टीमने तिथे राहात असलेल्या कुटुंबांचा आणि इतरांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली. तायल यांनी ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा केला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, एअरफोर्सवरील हल्ल्यावेळी दाखल झालेली एनएसजी टीम