Home »National »Delhi» Airchief Marshal Says On Shortfall In The Number Of Fighter Squadrons

फायटर जेट्सची कमतरता म्हणजे क्रिकेट टीममध्ये 11 ऐवजी 7 प्लेअर खेळवण्यासारखे : IAF चीफ

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 13:44 PM IST

  • पाकिस्तान आणि चीनकडून धोका असतानाही भारताकडे केवळ 33 स्क्वॉड्रन आहेत.
नवी दिल्ली- भारतीय वायूसेनेत फाइटर जेट्सची कमतरता असल्याचे एअरफोर्स प्रमुख बी. एस. धनोवा यांनी म्हटले आहे. हे अशा पध्दतीने आहे जसे की क्रिकेट टीममध्ये 11 च्या जागी 7 प्लेअर आहेत. आम्ही पाकिस्तानला आपली ताकद दाखविण्यास तयार असताना सरकारने फाइटर जेट्सची कमतरता हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

एअरफोर्स सर्व दृष्टीने सक्षम
- द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत धनोवा यांनी म्हटले आहे की, एअरफोर्स सर्व दृष्टीने सक्षम आहे. आम्ही माओवाद्याविरोधात कारवाई करु शकतो पण त्यासाठी सरकारची मंजुरी आवश्यक आहे.
- आम्हाला दोन मोर्चांवर लढायचे असेल तर 42 फाइटर स्क्वॉड्रन असणे गरजेचे आहे. एअरफोर्सकडे सध्या 33 फाइटर स्क्वॉड्रन आहेत. एका फाइटर स्क्वॉड्रनमध्ये 16-18 फायटर जेट्स असतात.
- धनोवा म्हणाले, दोन मोर्चांवर लढण्यासाठी एअरफोर्स ज्यूडिशियस फोर्स इम्प्लॉइमेंट फिलॉसफीवर काम करत आहे. आमच्या क्षमतेत वाढ होईल तेव्हाच आम्ही आकाशात शत्रुचा चांगल्या पध्दतीने मुकाबला करु शकतो.

आणखी काय म्हणाले एअरफोर्स प्रमुख
- पाकिस्तान हवाई मार्गाने सर्जिकल स्ट्राईक करण्याची रणनिती होती का यावर एअरफोर्स प्रमुख म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हवाई हल्ले करायचे असल्यास सरकारची तयारी हवी. याचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे आम्ही असे हल्ले करण्यास तयार आहोत.

Next Article

Recommended