आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aircraft Operated By Jet Airways India Ltd., Foreground, And IndiGo, A Unit Of Interglobe Enterprises Ltd., Are Seen From A Control Tower At Indira Gandhi International Airport (IGI) In Delhi (Photographer: Prashanth Vishwana

विमानतळ प्राधिकरण 3 हजार एकर जागा भाडेतत्त्वावर देणार : गजपती राजू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय विमानतळ प्राधिकरण त्यांची दोन ते तीन हजार एकर जमिन भाडेकरार तत्त्वावर देऊन मोठी रक्कम जमवू शकतात. या रकमेतून विमानतळाचा विकास करता येऊ शकेल, असे मत नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले. विमानतळ प्राधिकरणाचे खासगीकरण होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. विमानतळ प्राधिकरणाला त्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर देता यावी, यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना राजू म्हणाले की, प्राधिकरणाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात सादर केलेल्या प्रस्तावानुसार कायद्यात सुधारणा करून मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्याची परवानगी दिली जाईल. शहरी भागात प्राधिकरणाकडे जवळपास ५५ हजार हेक्टर जमिनीची मालकी आहे. २०२२ पर्यंत भारतात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील. प्राधिकरणाचे खासगीकरण कुठल्याही परिस्थितीत केले जाणार नसल्याचे राजू यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...