आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airtel चा Jio प्लॅन; 399 रुपयांत 84 दिवसांसाठी दररोज 1GB इंटरनेट, मोफत कॉलिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या ऑफरमध्ये अवघे 399 रुपये भरून ग्राहकांना 84 दिवस 84 जीबी इंटरनेट मिळणार आहे. यासोबतच कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा सुद्धा मिळणार आहे. एअरटेलच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ही ऑफर केवळ 4G फोन आणि 4G सिम असलेल्या प्रिपेड ग्राहकांसाठीच आहे.

या प्लॅनची तुलना जिओच्या प्लॅनशी केली जात आहे. Jio च्या प्लॅनमध्ये सुद्धा 399 रुपयांत 84 दिवस दररोज 1GB इंटरनेट दिला जात आहे. यासोबतच कॉलिंग, एसएमएस आणि रोमिंग सुद्धा मोफत आहे. जिओने जुलै महिन्यात हा प्लॅन लॉन्च केला होता. यापू्र्वी 309 रुपयांत एवढेच इंटरनेट आणि व्हॅलिडिटी देण्यात आली होती. एअरटेलचा नवीन प्लॅन पाहता जिओ आणि एअरटेलमध्ये थेट लढत सुरू असल्याचे चित्र आहे. 

पुढील स्लाईडवर एअरटेलचे दुसरे प्लॅन...
बातम्या आणखी आहेत...