आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारची क्‍लीन \'इंडिया मोहिम\', अजिंठा-वेरूळ होणार चकाचक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पर्यटनस्थळांची स्वच्छता व अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘क्लीन इंडिया’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे.
यानुसार अजिंठा-वेरूळ लेण्यांची साफसफाई करून तेथे नीटनेटके वातावरणनिर्मिती करण्याची सरकारची तयारी आहे. बुधवारी ताजच्या स्वच्छतेद्वारे मोहिमेला प्रारंभ होईल. केंद्रीय पर्यटन विभागाने ओएनजीसी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.

यांचा होणार समावेश : 1. ताजमहाल, 2. अजिंठा-वेरूळ, 3. लाल किल्ला (दिल्ली) 4. गोवळकोंडा किल्ला ,
5. महाबलिपुरम (तामिळनाडू).

अशी असेल मोहीम : पर्यावरणपूरक आराखड्यांतर्गत सुविधा अद्ययावत करणे. शुद्ध पेयजल तसेच कचरा व सांडपाणी व्यवस्थापन. सर्व ठिकाणी एकाच डिझाइनच्या मार्गदर्शक पाट्या. पर्यटकांसाठी विशेष मदत कक्षाची स्थापना आदीचा या मोहिमेत समावेश आहे.

पर्यटकांना भावला मराठी मुलूख
वैविध्यपूर्ण निसर्गाचे लोभस रूप आणि ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या स्थळांनी नटलेल्या महाराष्ट्राला गेल्या वर्षात कोट्यवधी देश-विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. केंद्रीय पर्यटन विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2011 मध्ये देशात सर्वाधिक 51 लाख विदेशी पर्यटकांनी पर्यटकांनी मराठी मुलुखाची वारी केली. इतकेच नव्हे तर 6.63 कोटी पर्यटकांनी महाराष्ट्राच्या पाहुणचाराची चव चाखली आहे. विशेषत्वाने जागतिक वारसा यादीतील अजिंठा-वेरूळ लेण्यांकडे पर्यटकांचा राबता राहिलेला आहे.

कोट्यवधींचे श्रद्धास्थान असलेला तिरुपती बालाजी आंध्र प्रदेशला चांगलाच पावला आहे. तब्बल 20.68 कोटी पर्यटकांच्या भेटीच्या जोरावर आंध्र प्रदेश देशातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ ठरले आहे. यादीत तामिळनाडू (18.41 कोटी) आणि उत्तर प्रदेश (16.84 कोटी) अनुक्रमे द्वितीय व तृतीय तर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असल्याचे आकडेवारीत म्हटले आहे.