आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Dobhals China Visit Is Canceled For Pathankot Terror Attack

आजपासून सुरू होणारा अजित डोभाल यांचा चीन दौरा रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा मंगळवारी होणारा नियोजित चीन दौरा रद्द झाला आहे. पठाणकोट एअरबेसवर झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सीमावाद सोडवण्यासाठी डोभाल चीनमध्ये ज्येष्ठ नेत्यांना भेटणार होते.

चीन आणि भारताच्या अधिकाऱ्यांनी हा दौरा रद्द करण्यात आल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. यासंबंधी नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये असलेल्या सीमावादावर चर्चा करण्यासाठी डोभाल भारताचे विशेष दूत आहेत. मंगळवारी सुरू होणाऱ्या या दोनदिवसीय दौऱ्यामध्ये डोभाल त्यांच्या समकक्ष अधिकारी यांग जाईची यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार होते. तसेच बुधवारी ते चीनचे प्रीमियर ली केकियांग यांचीदेखील भेटणार होते.
चीन आणि भारतामधील सीमावादाचा निपटारा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनयिंग यांनी सांगितले. या संधी अापण एक व्यवस्था बनवली असल्याचे सर्वांना माहिती आहेच. यानुसार दरवर्षी दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये बैठक होणार आहे. आता या दोन्ही देशांमधील नेत्यांच्या बैठकीची नवी तारीख नंतर जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.