आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संजय गांधींच्या एकाधिकारशाहीला ए. के. एंटनींनी दिले होते खुले आव्हान'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- व्हिसल ब्लोअर वेबसाईट विकीलिक्सने कधी काळी 'मिस्टर क्लीन' म्हटले गेलेले काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांना स्वीडिश विमान कंपनीचे एजंट असल्याचा खुलासा केला होता. आताही विकीलिक्सने काँग्रेस पक्षात व देशात 'मिस्टर क्लीन' म्हटले जात असलेले संरक्षणमंत्री ए. के. एंटनी यांच्यावर नेम साधला आहे. अमेरिकी केबलच्या आधारे विकीलिक्सने दावा केला आहे की, 1975 च्या काळात देशात जेव्हा आणीबाणी सुरु होती तेव्हा इंदिरा गांधींचे चिरंजीव संजय गांधी यांची चलती होती. त्यावेळी पक्षातील नेते एंटनी यांनी संजय गांधी यांना खुले आव्हान दिले होते.
केबलच्या माहितीनुसार, 1976 च्या गुवाहाटी येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात एंटनी यांनी संजय गांधी यांचे नेतृत्त्व मानायला नकार दिला होता तसेच अधिवेशनात खुले आम संजयच्या नेतृत्त्वाबाबत प्रश्नचिन्ह उठवले होते.
असांजेच्या वेबसाईटने दावा केला आहे की, काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत तत्कालिन स्थितीत पंतप्रधान इंदिरा गांधींचा लहान मुलगा संजय गांधी यांना स्पष्ट व उघड करणारे एंटनी दुसरे नेते बनले होते. त्याआधी पूर्व पश्चिम बंगालचे नेते प्रियरंजन दास मुन्शी यांनी संजय गांधींच्या धोरणांना व राजकारणाला कडक विरोध केला होता.
विकीलिक्सद्वारे सार्वजनिक केलेल्या या केबलला दिल्लीतील अमेरिकी दूतावासाने 26 नोव्हेंबर 1976 रोजी ही केबल वॉशिंग्टनला पाठवली होती. यात आणीबाणीतील काळात संजयच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांची सविस्तर माहिती केबलद्वारे पाठविली गेली होती.
केबलमध्ये दूतावासातील अधिका-यांनी अमेरिकन प्रशासनाला माहिती पाठविली होती की, गुवाहाटी अधिवेशनात केरळ प्रदेश काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष ए. के. एंटनी यांनी संजय गांधीचे पक्षात वेगाने वाढणा-या महत्त्वाबाबत व ताकदीबाबत खुले आव्हान दिले होते. एंटनी त्यावेळी अधिवेशनात म्हटले होते की, त्यांनी (संजय) देशासाठी किंवा पक्षासाठी असा कोणता मोठा त्याग केला आहे ज्यामुळे काँग्रेस पक्षात त्यांना इतके महत्व आणि पक्षात नंबर दोनचा दर्जा दिला जात आहे. याचबरोबर, दूतावासाने अमेरिकी प्रशासनला सांगितले होते की, आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांच्या एकाधिकारशाहीला ए. के. एंटनी आणि प्रियरंजन दास मुन्शी यांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच संजय गांधीचे दोन कडवे विरोधक म्हणून ते दोघे पुढे येत आहेत.