आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांनी विचारले होते- ABVP कोणत्या पक्षाशी संबंधीत संघटना ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आज वर्धापन दिन आहे. 9 जुलै 1948 रोजी मुंबईत स्थापन झालेली विद्यार्थ्यांची ही संघटना आज देश पातळीवर कार्यरत आहे. मुंबईतच मुख्यालय असलेल्या या संघटनेच्या स्थापनेचे श्रेय प्रा. अखिलेश बहल यांना दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत करणे, छात्रशक्तीच्या जोरावर राष्ट्रीय पुनर्निर्माणसाठी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राबद्दलचे चिंतन जागृत करणे हाच संघटनेचा मुळ उद्देश आहे. परिषद 9 जुलै हा दिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करते.
छात्र शक्ती - राष्ट्रशक्ती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद - एबीव्हीपी नावानेही ओळखली जाते. ज्ञान - शील - एकता हे परिषदेचे बोधवाक्य असून छात्र शक्ती - राष्ट्रशक्ती ! ही घोषणा आहे. परिषदेचे मत आहे की आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. त्यामुळे राष्ट्राच्या निर्मीतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असणार आहे.
देशातील सर्व कॉलेजमध्ये एबीव्हीपी
एबीव्हीपी संघटनेची देशातील प्रत्येक कॉलेजात कार्यकारिणी आहे. परिषदेचे दरवर्षी राष्ट्रीय अधिवेशन होते. त्याद्वारे नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी निवडली जाते. चार स्तरांवर परिषदेचे काम चालते. पहिली कार्यकारिणी महाविद्यालयांची, दुसरी शहर, तिसरी प्रदेश आणि चौथी राष्ट्रीय कार्यकारिणी असे साधारण परिषदेचे काम चालते. आता काही ठिकाणी जिल्हा कार्यकारिणी देखली करण्यात आल्या आहेत.
एबीव्हीपीचे कार्य
बांगलादेशी घुसखोर आणि काश्मीरमधून कलम 370 हटवणे यासाठी परिषदेने वेळोवेळी अंदोलने केली आहे आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नासाठी परिषद कॉलेज आणि विद्यापीठांशी झगडत असते. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना खासगी कोचिंग क्लासद्वारे स्पर्धा परीक्षेचे शिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी स्वामी विवेकानंद मोफत प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाते.
परिषदेचे राष्ट्रीय छात्रशक्ती नावाने दिल्ली येथून मुखपत्र प्रकाशित होते. एबीव्हीपी संघाशी संबंधीत संघटना आहे, मात्र परिषदेच्या कार्यकर्त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याला परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अमिताभ बच्चन यांनी विचारले होते - कोणत्या पक्षाची आहे ही संघटना
बातम्या आणखी आहेत...