आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय ऊर्जेची धरा कास आणि साधा आर्थिक विकास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी करावी लागणारी आयात टाळण्यासाठी अक्षय्य ऊर्जा काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वर्ल्डवाइड फंड फॉर नेचरच्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) मोहीमप्रमुख आरती खोसला यांनी केले. 23 मार्चला रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत विजेचे दिवे बंद करून त्या दृष्टीने एक पाऊल टाकायचे आवाहन डब्ल्यूडब्ल्यूएफने केले. सामाजिक-आर्थिक बदलाच्या उपक्रमात भास्कर व दिव्य मराठी समूह भागीदार आहे. त्यानिमित्त 16 आणि 17 मार्च रोजी दिल्ली हाट येथे आयोजित अर्थ अवर फेअरमध्ये पुनर्वापर शक्य असणार्‍या वस्तू तसेच सोलार होम अप्लायन्सेस यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.

शाश्वत जीवनशैलीसाठी सवयी बदलणे कसे शक्य आहे, हे दाखवणे हा प्रदर्शनाचा हेतू असल्याचे खोसला म्हणाल्या. पर्यावरण संरक्षणासाठी अनेक कंपन्या-संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याबरोबरच ग्लोबल वॉर्मिंग, विजेचा अवाजवी वापर याविषयी जनजागृतीसाठी या प्रदर्शनामुळे मदत झाली. प्रदर्शनात देशातील ग्रीन द गॅप, अँक्ट, ट्रॅश टू कॅश (प्रभात), युज मी वर्क्‍स, डब्ल्यूडब्ल्यूएफ नेचर शॉप आणि सोलार उत्पादक सहभागी झाले होते.

हवामान बदल हे तर आव्हान- हवामान बदल हे मोठे आव्हान असल्याचे मत कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉर्मस लाइफ इन्शुरन्सच्या सीएसआर प्रमुख नोनिका राजकुमार यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करून अक्षय्य ऊज्रेची कास धरायला हवी.

भारतात मोठा वाव- भारतात अपारंपरिक ऊर्जासाधने विपुल आहेत. पवनऊर्जा (45,000 मेगाव्ॉट), लघु जलविद्युत (15,000 मेगावॉट), बायोमास (30,000 मेगाव्ॉट) आणि सौरऊर्जा (50,000 मेगाव्ॉट) अशी देशाची क्षमता आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौरऊर्जा अभियानातून 2013 पर्यंत 1000 मेगाव्ॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.