आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणनीतीच्या दृष्टीने अल कायदापेक्षा आयएसआयएस जास्त धोकादायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात दररोज किमान एक लाख विमान हवेत उड्डाण घेतात अाणि खाली उतरतात. विमानाची चाके ज्या क्षणी हवेत झेपावतात, त्याक्षणी लाेकांच्या मनात भय दाटून येते. अातापर्यंत काेणत्याही दहशतवादी गटाला प्रवासी विमानाला लक्ष्य करणे माेठी उपलब्धी मानण्यात अाले अाहे. ११ सप्टेंबरनंतर अल कायदा सतत हा प्रयत्न करत राहिला, मात्र अपयशी ठरला. मात्र, अायएसअायएस हे करण्यात यशस्वी झाल्याचे सगळ्यांनी मान्य केले अाहे. ३१ अाॅक्टाेबरला सेंट पीटर्सबर्गपासून इराणला जाणाऱ्या मेट्राेजेटच्या विमानाला उडवून देणे हा इसिसचाच कारनामा मानला जात अाहे.

या घटनेचे दूरगामी परिणाम झाले अाहेत. अमेरिका हाेमलंॅड सिक्युरिटीने काही विदेशी विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था कडेकाेट केली अाहे. विमानतळावरील कर्मचाऱ्यांना अाता अधिक तपासणीतून जावे लागत अाहे. सिनाई हल्ल्याने अायएसअायएसच्या क्षमतेबाबत जे संकेत दिले अाहेत, ते पाहता ही व्यवस्था पुरेशी अाहे का? ती अाता दुनियेतील सगळ्यात प्रमुख दहशतवादी संघटना बनली अाहे. यापूर्वी काेणत्याही अन्य दहशतवादी संघटनेचे कामकाज अशाप्रकारे चालत नव्हते. ते सैनिकी संघटन, राजकीय अांदाेलन अाणि दहशतवादाच्या व्यापाऱ्याची भूमिका एकाचवेळी निभावत अाहेत. ते अचानकपणे हल्ले करण्यात अत्यंत सक्षम अाहेत.

संघटनेची मुख्य भूमिका स्पष्ट स्वरुपात सैनिकी हालचालींवर केंद्रित अाहे. इराक अाणि सिरियाच्या विशिष्ट भागावर कब्जा करून खलीफा साम्राज्याची घाेषणा केल्याने त्यांना विशेष अाेळख प्राप्त झाली अाहे. अनुयायांना अापल्याकडे खेचण्यासाठी ही विशेष स्थिती अधिक अाकर्षक अाहे. पश्चिमी देशांमधील संघटनेचे समर्थक जेव्हा कुठे हल्ल्याची तयारी दर्शवतात, तेव्हा त्यांना मध्यपूर्वेतील युध्दात सहभागी हाेण्याचे अावाहन केले जाते. पश्चिमेत झालेले अनेक हल्ले हे एकेकट्या अतिरेक्यांनी केले अाहेत. अायएसअायएसमध्ये इस्लामी गट हिज्ब उट तहरीर ( अाजादीची पार्टी) कडून एका बाबतीत प्रेरणा घेतली अाहे. हिज्ब अनेक दशकांपासून सक्रिय अाहे. ते हिंसेबाबत समर्थन करण्यापासून दूर राहतात. त्यांचा राजनैतिक दृष्टिकाेन अायएसअायएसपेक्षा भिन्न अाहे. हिज्ब धर्मनिरपेक्ष देशांमध्ये महत्वपूर्ण पदांवर गुपचूप अापल्या समर्थकांना तैनात करून याेग्य संधी येताच उठाव करून सत्ता हस्तगत करण्याच्या रणनीतीला प्राधान्य देत अाला अाहे.

हिज्बची रणनीती अातापर्यंत फारशी यशस्वी झालेली नाही. त्यांच्या ६३ वर्षांच्या इतिहासातील ३ वेळच्या तख्त पलटवण्याच्या घटनांमध्ये ते अपयशी ठरले अाहेत. तरीदेखील अायएसअायएसने गत चार महिन्यात दाेन ठिकाणी सरकार उलथवून टाकण्याचे प्रयास केले. संयुक्त अरब अमिरातने २ अाॅगस्टला घाेषणा केली की खिलाफतच्या स्थापनेसाठी सत्ता उलथून टाकण्याचा प्रयास करणाऱ्या ४१ व्यक्तींवर खटला चालवला जाईल. इथिअाेपियात २८ अाॅक्टाेबरला सत्ता परिवर्तनासाठी कट केल्याच्या अाराेपातून काही सदस्यांना अटक करण्यात अाली अाहे.
अायएसअायएस अाता असा बनला अाहे, जे अल कायदा बनू शकला नव्हता. स्वयंसेवकांना प्रेरित करणारे एक अांदाेलन बनू लागला अाहे. अायएसअायएसचा नेता अबू बकर अल बगदादी याने जून २०१४ मध्ये खिलाफतची स्थापना करतानाच मुस्लिमांना हत्यार उचलण्याचे अावाहन केले हाेते. त्याने म्हटले हाेते, मुसलमानांनाे अापल्या खिलाफत साम्राज्याच्या अाजूबाजूला एकत्र या. त्यातून तुम्ही पृथ्वीचे शहंशाह अाणि युध्दाचे सेनापतींसारखे हाेऊ शकता, जे तुम्ही अनेक शतकांपासून हाेतात अाणि स्वामीच्या रूपात अभिमानाने राहू शकाल.
हे सांगणे मुश्कील अाहे की बगदादीच्या शब्दांवर काेण अमल करेल. मात्र विमानविस्फाेटाबाबत शाेध घेणारे पथक शर्म अल शेख विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बारीक नजर ठेवून अाहे. कर्मचाऱ्यांमध्ये सुन्नी उग्रवादींची घुसखाेरी झालेली असू शकते. ज्यांनी गतवर्षी सिनाईला अायएसअायएसच्या खिलाफतचा प्रांत म्हणून घाेषित केले हाेते. या प्रकरणात तपासणी करणाऱ्या पथकाचे म्हणणे अाहे की सिरियातील रक्काच्या मुख्यालयात विमान पाडण्याच्या कटाची
माहिती नव्हती.