आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Al Qaeda Opens It Branch In India, Alim Omar Amde Branch Head

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल-कायदाची भारतात शाखा, पाकिस्तानी वंशाचा अलीम उमर भारतातील म्होरक्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय मुस्लिम अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या इशार्‍यावर नाचणार नाहीत, असा दावा केला आहे. त्यानंतर काही तासांतच दहशतवादी संघटना अल-कायदाने भारतात त्यांची शाखा सुरु केली असल्याचे वृत्त आले आहे. मुळचा पाकिस्तानातील अलीम उमर याला या संघटनेचा भारतातील प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याचा आज (शनिवार) खुलासा केला आहे.

अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरीने जवळपास 15 दिवस आधी भारतीय उपखंडात नवी शाखा उघडणार असल्याचे जाहीर केले होते. अल-कायदाकडून जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये जवाहिरी अल-कायदाची नवी शाखा भारतीय उपखंडात सुरु करणार असल्याची बतावणी करताना दाखविण्यात आला आहे.
भारतात अल-कायदाची शाखा
हिंदी वृत्तवाहिनीने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हवाल्याने म्हटले आहे, की भारतात अल-कायदा, इराक आणि सीरियामध्ये नरसंहार घडवून आणणार्‍या आयएसआयएसला प्रोत्साहन देणार्‍या काही लोकांचा एनआयएने शोध घेतला आहे. एनआयए त्यांच्या विरोधात लवकरच एफआयआर दाखल करण्याच्या तयारीत आहे.
आयएसआयएसचे समर्थन करणार्‍यांची ओळख पटली
सूत्रांच्या माहितीनुसार, आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून चार तरुण गेले होते. त्यांना आयएसआयएसची ओळख करुन देणारे आणि त्यांना पाठवणार्‍यांचा शोध लागला आहे. याशिवाय, आयएसआयएस प्रमुख अल- बगदादीच्या भाषणाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात हिंदीसह सर्व भाषांमध्ये त्याचे सबटायटल्स देण्यात आले होते. या व्हिडिओसाठी हिंदीमध्ये सबटायटल्स देणार्‍या व्यक्तीचाही शोध एनआयएने घेतला आहे. ती व्यक्ती कर्नाटकातील भटकल येथील असल्याचे सांगितले जात आहे.
सिंगापूरमधून एकाला अटक
सुरक्षा यंत्रणांनी सिंगापूरमधून आयएसआयएसशी संबंधीत एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याला चौकशीसाठी भारतात आणले जाणार आहे.

छायाचित्र : अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी.