आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात यूरोपच्या धर्तीवर हल्ले करा, \'अल कायदा\'ने दहशतवाद्यांना दिली चेतावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'अल कायदा' या दहशतवादी संघटनेचा भारतात मोठा हल्ला करण्‍याचा इरादा आहे. भारतात यूरोपमध्ये केलेल्या हल्ल्यांच्या धर्तीवर हल्ले करा, अशी चेतावणी अल कायदाने आपल्या दहशतवाद्यांना दिली आहे. अल कायदाने ही धमकी बांगलादेशची राजधानी ढाका येथील अतिरेकी हल्ल्यानंतर दुसर्‍या दिवशी दिली आहे. ढाक्यात 2 जुलैला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 20 जण ठार झाले होते.

काय म्हणाला अल कायदाचा म्होरक्या?
- अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) चा म्होरक्या असीम उमरने रविवारी भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. भारतात मुसलमानांनी एकत्र यावे. यूरोपच्या धर्तीवर भारतात मोठे हल्ले करावे. प्रशासकीय अधिकारी व पोलिस अधिकार्‍यांना ठार मारा, असे उमरने म्हटले आहे.
- मागील दोन वर्षांपासून अल कायदा भारतात मोठा हल्ला करण्यासाठी कट रचतोय. दहशतवादी कारवाया करण्‍यासाठी मुसलमानांचा वापर करत आहे.
- अमेरिकेने AQIS ला विदेशातील दहशतवादी संघटना व उमर याचा वर्ल्ड टेररिस्टच्या यादीत समावेशकेला होता.
- अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा SITE ने उमरचे हे चिथावणीखोर वक्तव्य ट्रॅक केले आहे.
- उमरच्या या वक्तव्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

दुसरीकडे, भारतीय सुरक्षा यंत्रणा AQIS व ISIS च्या प्रत्येक हलचालीवर लक्ष ठेवून आहे.
- दिल्ली पोलिसांनी मागील वर्षी AQIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक केले होते.
- राष्ट्रीय तपास संस्था (NIA) व पोलिसांनी आतापर्यंत ISISशी संबंधित 54 संशयितांना अटक केले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, कोण आहे असीम उमर?
बातम्या आणखी आहेत...