आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Al Queda News Al Qaeda Chief Zawahari Threatened

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल-कायदाच्या निशाण्यावर भारत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अल-कायदाने या दहशतवादी संघटनेने आपला मनसुबा जाहीर करताना पुढील लक्ष्य भारत असल्याचे स्पष्ट केले आहे. संघटनेचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीने व्हिडिओ जारी करून आपले विखारी विचार मांडताना भारतात संघटनेची शाखा सुरू करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी अल-कायदाची मीडिया संस्था अस-साहबने ‘वॉर शूड कंटिन्यू, मेसेज टू मुस्लिम्स ऑफ कश्मीर’ या व्हिडिओ मध्ये आपले मनसुबे मांडले होते. ‘कैदत अल-जिहाद इन इंडियन सबकाँटिनंट असे या व्हिडिओचे शीर्षक आहे. यू-ट्यूबसह सोशल मीडियावरून हा झळकला आहे. त्यामागे नेमके कोण आहेत, म्होरक्याचे नेमके मनसुबे काय आहेत, त्याचा धोका इतर कारणांचा घेतलेला हा वेध.
कोण आहे जवाहिरी ?
मूळचा इजिप्तचा अयमान मोहंमद अल-जवाहिरी हा व्यवसायाने डॉक्टर होता. कट्टरवादातून इजिप्शियन इस्लामी जिहादमध्ये तो पहिल्यांदा सक्रिय होता, परंतु पुढे अल-कायदामध्ये सक्रिय झाला. ९/११ च्या घटनेनंतर जवाहिरीचे नाव जाहीर झाले. संघटनेचा म्होरक्या आेसामा िबन लादेनचा तो उजवा हात मानला जात होता, परंतु लादेनचा खात्मा झाल्यानंतर संघटना त्याच्या हातात आली. अमेरिकेच्या २२ मोस्ट वाँटेडच्या यादीत जवाहिरीचे नाव असून त्याला पकडून देणाऱ्यास सुमारे कोटी ५० लाख डॉलरचे बक्षीस अमेरिकेने ठेवले आहे.
२०११ मध्ये ओसामा बिन लादेनचा खात्मा झाल्यापासून जवाहिरी म्होरक्या.

आयबी अस्सलपणा तपासणार : केंद्रसरकारने जवाहिरीचा व्हिडिआे िकती अस्सल आहे, याचा तपास करण्याचे आदेश गुप्तहेर िवभागाला िदले आहेत. आयबी सातत्याने दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
बलिदानाचे आवाहन
गेल्यावर्षी उमरने एक व्हिडिआे जारी करून अमेरिकेच्या िवरोधात मुस्लिम समुदायाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. सर्वांनी एकत्र येऊन शेवटच्या जिहादमध्ये अमेरिकेला पराभूत करण्याचे काम केले पाहिजे.
पुढे धोका आहे...
कैदत-अल-जिहाद
अल-कायदाच्यानवीन शाखेचे नाव कैदत-अल-जिहाद असे आहे. यातील सदस्य भारतीय उपखंडातील मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाला आमच्या पद्धतीने दूर करण्यात येईल, असे जवाहिरीने म्हटले आहे.

इस्लामिक स्टेटशी स्पर्धा
अल-कायदाचेभारतीय उपखंडातील हालचाली केवळ इस्लामिक स्टेटच्या स्पर्धेतून वाढल्याचे जाणकारांना वाटते. इस्लामिक स्टेटने गेल्या काही महिन्यांत सिरिया, इराकमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत िनर्माण केली आहे. त्यामुळे अल-कायदाची दहशत संपुष्टात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अल-कायदाने उपखंडात संघटनेचे जाळे िनर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

शरियत आणि काश्मीरसाठी
देशावरिब्रटिशांचा प्रभाव राहिला आहे, परंतु िब्रटिश सोडून गेल्यानंतरही भारत आणि उपखंडात त्यांच्या िवचारांचाच प्रभाव जाणवतो. वास्तविक भारतात शरियत कायदा लागू झाला पाहिजे, असे असीम उमरने नोव्हेंबर २०१२ मध्ये अल-कायदाच्या एका व्हिडिआेमध्ये म्हटले होते. काश्मीरमधील मुस्लिम समुदायाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी या भागातील जिहाद सुरूच राहील, असे दोन वर्षांपूर्वीच उमरने म्हटले होते.