आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Ministers Get Email Threat Warning Of Terror Attack On Republic Day

राजस्थानच्या १६ मंत्र्यांना अतिरेक्यांची धमकी, लष्कर आणि हाफिज सईदकडून अपहरणाचा कट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजस्थानमध्ये भाजप सरकारच्या १६ मंत्र्यांना इंडियन मुजाहिदीनच्या नावाने धमकी देणारे ई-मेल मिळाले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. २६ जानेवारीला बाॅम्बस्फोट करण्याची धमकीही त्यात देण्यात आली आहे. नेत्यांचे अपहरण करण्याच्या कटाला अंतिम स्वरूप दिले जात असल्याची गुप्तचर यंत्रणेची माहिती आहे.

भाजप सरकारचे मंत्री गुलाबचंद कटारिया, राजेंद्र राठोड, अरुण चतुर्वेदी, प्रभुलाल सैनी, किरण माहेश्वरी, गजेंद्रसिंह अनिता भदेल, कालिचरण सराफ, राजपाल सिंह, सुरेंद्रपाल आणि पुष्पेंद्रसिंह यांच्यासह १६ कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना सरकारी मेलवरून धमकी मिळाली होती. ही धमकी इंडियन मुजाहिदीनकडूनच आली आहे का, याची खातरजमा करण्याचे काम तपास यंत्रणा करत आहेत.

सुरक्षा वाढवणार
गृहमंत्रालय व राजस्थान सरकारने ही धमकी गांभीर्याने घ्यावी, असा सल्ला गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे. धमकी मिळालेल्या नेत्यांची यादी गृहखात्याला पाठवण्यात आली असून त्यांची सुरक्षा वाढवण्यात येणार असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.