आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता 2 डिसेंबरपर्यंत सर्व हायवे टोल फ्री, जाणून घ्या, 15 दिवसांमध्ये काय झाले ?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारने ज्या १७ सेवांसाठी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची सवलत दिली होती ती गुरुवारी मध्यरात्रीनंतर संपुष्टात येत आहे. म्हणजे बाजारात जुन्या नोटा चालवण्याचे सर्व वैधानिक मार्ग बंद होतील. आता फक्त बँकांत जाऊन जुन्या नोटा जमा करणे किंवा बदलणे हा एकच मार्ग आहे. त्यासाठी ३० दिवसांचा वेळ शिल्लक आहे. सरकारने नोटबंदीच्या घोषणेनंतर १७ सेवांसाठी जुन्या नोटा चालवण्याची २४ नोव्हेंबरपर्यंत सवलत दिली होती. गुरुवारी ही सवलत काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, सरकारने देशभरातील महामार्ग २ डिसेंबर पर्यंत टोल फ्री केले आहेत. त्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत टोल नाक्यांवर ५०० रुपयांच्या जुन्या नोटा चालणार आहेत.

१५ दिवसांतील काम
1 लाख एटीएमचे कॅलिब्रेशन पूर्ण. म्हणजे ५०% एटीएममधून ५०० व २००० च्या नव्या नोटा मिळू लागल्या. देशात २.०२ एटीएम आहेत
6 लाख कोटी रुपये जमा झाले बँकात १.५ लाख कोटी काढले.
21 हजार कोटी रुपये जनधन खात्यांत आजवर जमा.
- राष्ट्रीय महामार्ग टोलमुक्त राहिल्याने कंपन्यांचे ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

नवी घोषणा- ३१ डिसेंबरपर्यंत डेबिट कार्डवरील सर्व व्यवहारांवर सेवा शुल्क
डेबिट कार्डवर ३१ डिसेंबरपर्यंत सेवा शुल्क किंवा स्विचिंग चार्ज लागणार नाही. सर्व सरकारी व काही खासगी बँका त्यासाठी तयार झाल्या आहेत. येथे सेवा शुल्कावरच सेवा कर लागतो. म्हणजे सेवा शुल्क नसेल तर सेवा करही लागणार नाही.

आजपासून संपत असलेल्या सुविधेबाबत लक्षात ठेवण्यासारख्या या महत्त्वाच्या बाबी
या १७ ठिकाणी जुन्या नोटा बंद

पेट्रोल पंप, सरकारी रुग्णालये, रेल्वे-विमान, मेट्रोचे तिकीट बुकिंग, दूध केंद्रे, वीज व पाणी बिल, सार्वजनिक वाहतूक, स्मशानभूमी, सरकारी व खासगी मेडिकल स्टोअर्स, एलपीजी सिलिंडर, रेल्वे केटरिंग व स्मारकांचे तिकीट, कोर्ट फी, सहकार स्टोअर्स.

दिव्य मराठी Q&A
- ५००/१००० रुपयांच्या जुन्या नोटा आता चालणार नाहीत का?

नाही. कारण सरकारने दिलेली मुदत गुरुवारी मध्यरात्रीपासून संपते आहे. मात्र सरकारला वाटल्यास त्याची मुदत वाढवली जाऊ शकते.

- पण माझ्याकडे अजूनही जुन्या नोटा आहेत, त्याचे काय होईल?
चिंता करण्याचे कारण नाही. तुम्ही कुठल्याही बँकेत जाऊन जुन्या नोटा बदलून घेऊ शकता. मात्र तुम्हाला २००० रुपयेच बदलता येतील. त्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत वेळ आहे.

- तर मग ३० डिसेंबरनंतर जुन्या नोटा बदलताच येणार नाहीत?
आणखी एक संधी मिळेल. पुढच्या वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेत जाऊन नोटा बदलता येतील. मात्र तेव्हा आजवर नोटा का बदलल्या नाहीत, हे सांगावे लागेल.

- पेट्रोल पंप, बिग बाजारमधून पैसे मिळणे बंद होऊन जाईल का?
नाही. सरकारच्या उर्वरित घोषणा सुरू राहतील. एसबीआयचे पीओएस मशीन्स असलेल्या पेट्रोल पंपावर २००० रुपये मिळतील. बिग बाजारात डेबिट कार्डवर २००० रुपये काढता येतील.

- शेतकऱ्यांना ५०० च्या नोटाची सूट मिळाली त्याचे काय?
शेतकऱ्यांना ५०० च्या जुन्या नोटांवर सरकारी दुकानात बियाणे मिळतील.

- टोल व एअरपोर्ट पार्किंगची सवलत होती, ती सुरू राहील का?
नाही. राष्ट्रीय महामार्गावरील टोलमुक्ती गुरुवारी मध्यरात्री संपेल. म्हणजे तुम्हाला टोल द्यावा लागेल. एअरपोर्ट पार्किंगची सूट २८ नोव्हेंबरपर्यंत सुरू आहे.

- लग्नासाठी २.५ लाख रुपये काढण्याची मुभा कायम आहे का?
हो. ही सुविधा सुरू राहील. फक्त जुन्या नोटा बाजारात स्वीकारण्याची सुविधा संपत आहे. उर्वरित निर्णयात फारसे बदल नाहीत.

- बँकेतून चेकद्वारे हप्त्याला २४००० रुपये काढण्याची मर्यादा अद्यापही सुरू आहे का?
नाही. ही सवलत गुरुवारी संपत आहे. आता तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे चेकद्वारे पैसे काढता येऊ शकतील.

पुढे वाचा,
डेबिट कार्डद्वारे १ हजाराच्या पेमेंटवर ७५. व ५ हजारच्या पेमेंटवर रु. ५० चा फायदा...
सहकारी बँकांना नाबार्ड देणार २१ हजार कोटी
तरतूद तुटपुंजी, रब्बीला कशी पुरेल : शरद पवार
बातम्या आणखी आहेत...