आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलिबाबाची एका दिवसांत ५२ हजार कोटींची विक्री, पहिल्या १२ सेकंदांतच १२,३०० कोटींचा व्यवहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनची ऑनलाइन विक्री करणारी प्रसिद्ध कंपनी ‘अलिबाबा’ने एका दिवसात सर्वाधिक विक्रीचा आपलाच विक्रम गेल्या आठवड्यात मंगळवारी मोडित काढला. या एका दिवसात २७ हजार ब्रँड विकले गेले. सुरुवातीच्या १२ सेकंदांतच कंपनीने १२,३०० कोटी रुपयांचा व्यवहार केला. दिवसभरातील हा व्यवहार ५२ हजार कोटींचा होता.
गेल्या वेळी कंपनीने केलेल्या विक्रीच्या विक्रमापेक्षा ४० टक्के अधिक विक्री झाली आहे. गेल्या वर्षी अलिबाबाने याच दिवशी सुमारे ५.८ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ३५ हजार ७०० कोटी रुपयांचा व्यवहार केला होता. तेव्हा कंपनीला १५ कोटी ऑर्डर्स मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे ग्राहकांना तेव्हा ५० टक्क्यांपर्यंतची सवलत देण्यात आली होती.
साइटही क्रॅश नाही
गेल्या वेळी ग्राहकांच्या एकदम उड्या पडल्याने साइट क्रॅश होण्यासारखे प्रकार घडले होते. यंदा मात्र एकदम एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी ऑर्डर्स नांेदवूनही ही समस्या उद््भवली नाही. २२० देशांतील ग्राहकांनी अलिबाबाच्या या सवलतीचा लाभ घेतला. विशेष म्हणजे सुमारे ४५ टक्के ऑर्डर्स केवळ मोबाइल फोनमार्फत नोंदल्या गेल्या होत्या.
तुलना भारत-चीनची
व्यवहार चीन भारत
ई-कॉमर्स सध्या २४ लाख कोटी ६७ हजार कोटी
ई-कॉमर्स २०१७ पर्यंत ४५ लाख कोटी १.२३ लाख कोटी
बाजारातील अलिबाबा : १४.०७
(टीएसएस, ओएनजीसी, रिलायन्स लाख कोटी रुपये व आयटीसीच्या बरोबरीने)
भारत मागे का?
विक्री
चीन : अलिबाबा विक्रीपूर्व मोहीम राबवते. संबंधित कंपन्या महिनाभर मिळणारी सवलत व उत्पादनांच्या जाहिराती चालवतात.
भारत : फ्लिपकार्ट आिण स्नॅपडीलवर खरेदी करणा-यांची अशी कायम तक्रार असते की वस्तूंची प्रत्यक्ष विक्री सुरू करण्यापूर्वी किमती वाढवल्या जातात.
विक्रेते किती?
चीन : पाच वर्षांत अलिबाबावर विक्री करणा-यांचीसंख्या २७ वरून २७ हजारांवर गेली आहे.
भारत : नामांकित कंपन्या ई-कॉमर्सच्या माध्यमातून उत्पादनांच्या विक्रीतून अंग काढून घेत आहेत. ग्राहकांची नाराजी त्यांना नको आहे.
भारतीय ई-रिटेलर्सना प्रतिसाद नाही
स्नॅपडील : या भारतीय ई-रिटेलर कंपनीने गेल्या आठवड्यात मंगळवारी खास विक्री माेहीम चालवली. यात विविध उत्पादनांवर १० ते ७० टक्के सूट देण्याची ऑफर होती. मात्र ग्राहकांची एक तक्रार अशी होती की, ऑनलाइन विक्रीतील ऑफर म्हणजे ‘उपलब्ध नाही’ असा होतो का?
अमेझॉन : अमेझॉनच्या अॅपीनेस डेच्या दिवशी वस्तू खरेदी करण्यापूर्वी अॅप डाऊनलोड करावयाचे होते. यात डिस्काऊंट व्यतिरिक्त महिन्याला ११ हजार रुपयांचा फायदा मिळवण्याचीही संधी होती. मात्र, ग्राहकांनी या ऑफरला फार प्रतिसाद दिला नाही.