नवी दिल्ली - नशामुक्तीबाबत जनजागृती करत असलेल्या आम आदमी पार्टी (
आप)च्या आमदार अलका लांबा यांच्यावर आज (रविवार) सकाळी दिल्ली येथील कश्मीरी गेटच्या यमुना बाजारमध्ये अचानक हल्ला झाला. दरम्यान, हल्लेखोर हे एका मिठाईच्या दुकानात काम करत असून, ते दुकान भाजप आमदार ओमप्रकाश शर्मा यांच्या मालकीचे आहे. त्यामुळे हा हल्ला भाजपनेच घडवून आणला, असे ट्वीट 'आप'चे नेता आशुतोष यांनी केले.
हॉस्पिटलमध्ये उपचार
आपच्या आमदार अलका लांबा या 'नशा मुक्त भारत' अभियान राबवत आहे. आप समर्थकांनी या अभियानाला '9 ऑगस्ट क्रांती दिवसा'चे नाव दिले आहे. हे अभियान राबवत असतानाच अचानक त्यांच्यावर हल्ला झाला. यात त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
लांबा म्हणाल्या, 'डोके फुटले तरी मैदान सोडणार नाही'
लांबा यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. त्यांनी ट्वीट करून म्हटले, '' 9 ऑगस्ट क्रांती दिवस.. नशेच्या विरुद्ध ही लढाई सुरूच राहील.. ही आमची जिद्द आहे... यामुळेच माझ्यावर हल्ला करून माझे डोके फोडले गेले... त्यातून रक्त वाहत असतानाही मी मैदान सोडणार नाही... ऑगस्ट क्रांती दिन
पुढील स्लाइड्वर पाहा, संबंधित फोटोज...