आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alka Lamba Attack By Unknown People In Kashmiri Gate

VIDEO : आमदार लांबांनीच केली तोडफोड; प्रकरणाला वेगळे वळण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा - Divya Marathi
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाच्‍या (आप) आमदार अलका लांबा यांच्‍यावर काल (रविवार) अनोळखी व्‍यक्‍तींनी दगडफेक केली. मात्र, एका दुकानदाराने पोलिसांना दिलेल्‍या CCTV फुटेजमुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. यात आमदार लांबा आणि त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍यांनी हुज्‍जत घालून सुरुवात केल्‍याचे दिसत आहे.
काय आहे सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये
फुटेजमध्‍ये अलका लांबा या मिठाईच्‍या दुकानात समर्थकांसह छापा मारण्‍यासाठी गेल्‍यात. त्‍यांच्‍या समर्थकांनी दुकानातील काउंटरवरील सामान फेकून दिले. स्‍वत: आमदार लांबा या दुकानाच्‍या काउंटरवर ठेवलेल्‍या बिलिंग मशीनला धक्का देताना दिसत आहेत. त्‍यानंतर दुकानातील कामगारांनी दगडफेक केली. लांबा यांच्‍यावर दिल्लीच्‍या कश्मीरी गेट परिसरात दगडफेक झाली होती. त्‍यात त्‍यांच्‍या डोक्‍याला इजा झाली. त्‍या व्‍यसनमुक्‍ती जनजागृती अभियान राबवत असताना हा प्रकार घडल्‍याचा दावा 'आप'ने केला होता. पोलिसांनी दगडफेक करणा-या एका व्‍यक्‍तीला अटक केली आहे. पण, या फुटेजमुळे या प्रकारणाला वेगळे वळण मिळाले आहे.
लांबा म्‍हणाल्‍या, 'डोके फुटले तरी मैदान सोडणार नाही'
लांबा यांनी त्‍यांच्‍यावर झालेल्‍या हल्‍ल्‍याची माहिती सोशल मीडियावर दिली. त्‍यांनी ट्वीट करून म्‍हटले, '' 9 ऑगस्‍ट क्रांती दिवस.. नशेच्‍या विरुद्ध ही लढाई सुरूच राहील.. ही आमची जिद्द आहे... यामुळेच माझ्यावर हल्‍ला करून माझे डोके फोडले गेले... त्‍यातून रक्‍त वाहत असतानाही मी मैदान सोडणार नाही... आपल्यावर हल्ला झाला असला तरी अंमली पदार्थविरोधी मोहीम 15 आगस्टपर्यंत चालूच राहणार आहे.
पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्या
अल्का लांबा २० वर्षे काँग्रेसमध्ये विविध पदांवर कार्यरत होत्या. त्यानंतर अखेर त्यांनी २०१३ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकून आम आदमी पार्टीत प्रवेश केला. ‘गो इंडिया फाउंडेशन’ ही एनजीओदेखील त्या चालवतात.
ड्रग्जमाफियांशी राजकीय नेत्यांचेच संबंध
एखाद्या दुकानात काम करणारा माणूस असा हल्ला का करेल ? भाजप आमदाराच्या मालकीचे हे दुकान असून त्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. अंमली पदार्थाच्या व्यवसायाशी राजकीय नेत्यांचा संबंध असल्याच्या अनेक घटना दिल्लीत समोर आल्या आहेत. स्थानिक नेत्यांशी संबंध असल्याशिवाय अंमली पदार्थाचा काळा धंदा चालू शकत नाही. म्हणूनच पोलिसांनी कसून तपास केला पाहिजे, असी मागणी आपचे सिंह यांनी केली आहे.
धुसफूस सुरूच
आप आणि भाजप यांच्यात विधानसभा निवडणुकीपासूनच धुसफूस सुरू होती. त्यात आपच्या अनेक नेत्यांच्या पदव्यांचे प्रकरण असो किंवा भ्रष्टाचाराचे मुद्दे, यावर भाजपसह काँग्रेसने जोरदार टीका केली होती. त्यानंतर आपने जाहिरात मोहिमेद्वारे भाजपला लक्ष्य केले होते. एकूणच दोन्ही पक्षांतील वैर वाढत चालल्याचे दिसते.
पुढील स्‍लाइड्वर पाहा, संबंधित फोटोज...