आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS: या स्टायलिश महिला नेत्याने काँग्रेसचा \'हात\' सोडून डोक्यावर घेतली \'आप\'ची टोपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसला रामराम ठोकून आम आदमी पार्टीची टोपी डोक्यावर घेतलेल्या प्रसिद्ध महिला नेत्या अलका लांबा या खासगी आयुष्यातही एकदम स्टायलिश आहेत. राजकारणातही लांबा यांना स्टायलिश नेत्या म्हणूनच ओळखले जाते. अलका लांबा यांची वत्कृत्त्वशैली देखील चांगली आहे. त्यांच्या या सर्व गुणांबरोबरच वादाची किनारही त्यांच्या व्यक्तीमत्तत्वाला कायम चिकटलेली असते. गुवाहाटी येथील पीडित तरुणीची ओळख सार्वजनिक करणे असेल किंवा पतीपासून वेगळे राहाणे, अशा वादांमुळे त्या कायम चर्चेत राहातात.
महाविद्यालयीन जीवनापासूनच अलका लांबा यांना लाइम लाइटमध्ये राहाणे पसंत होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक स्टेज शोमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यात विजयी देखील झाल्या होत्या. यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्व आणखी उठावदार झाले. महाविद्यालयीन जीवनात एनएसयुआयच्या सदस्य राहिलेल्या लांबा यांनी नंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवाहात प्रवेश केला. 20 वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेल्या अलका लांबा यांनी आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील यशानंतर अचानक या पक्षात प्रवेश केला आहे. याबद्दल असे बोलले जाते, की त्यांनी काँग्रेसकडे दिल्ली विधानसभा निवडणूकीत उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्यामुळे त्या नाराज होत्या. याबद्दल त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
काँग्रेस पक्षाला अलविदा केल्यानंतर अलका लांबा यांनी राहुल गांधींबद्दल तिखट प्रतिक्रीया दिली होती. वास्तविक त्या जेव्हा पक्षात होत्या तेव्हा राहुल यांच्या प्रत्येक निर्णयाची आणि त्यांच्या धोरणांच्या कट्टर पुरस्कर्त्या होत्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या निवृत्तीच्या सामन्यात राहुल गांधीच्या उपस्थितीला जेव्हा अनलकी म्हटले गेले होते, तेव्हा राहुल गांधीच्या बचावात अलका लांबा सर्वप्रथम मीडियासमोर आल्या होत्या. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी कायम राहुल गांधीची स्तुति केलेली आहे. आता त्यांनी आप मध्ये केलेला प्रवेश किती योग्य ठरतो, की येथेही त्या वादग्रस्तच राहातात हे पाहाणे औत्सूक्याचे राहाणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये, अलका लांबा आणि वाद...
(सर्व छायाचित्रे अलका लांबा यांच्या फेसबुकपेजवरुन साभार)