आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alka Lamba News In Marathi Alka Lamba Quits Congress.

दिल्‍ली कॉंग्रेसला धक्‍का, राहुल गांधींच्‍या निकटवर्तीय अलका लांबांचा पक्षाला रामराम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्‍यानंतर कॉंग्रेसमध्‍ये प्रचंड असंतोष उफाळून येत आहे. या वादातून कॉंग्रेसला दिल्‍लीत एक मोठा धक्‍का बसला आहे. कॉंग्रेसच्‍या तरुण नेत्‍या अलका लांबा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्‍यांना आम आदमी पार्टीत जाण्‍याची इच्‍छा व्‍यक्त केली आहे. यासंदर्भात लांबा यांनी 'आप'चे ज्‍येष्‍ठ नेते योगेंद्र यादव यांची भेट घेतली. पक्षाला रामराम ठोकताना त्‍यांनी कॉंग्रेसच्‍या हायकमांडवर चांगलेच तोंडसुख घेतले.

अलका लांबा यांनी एनएसयुआयचे राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदही भुषविले आहे. त्‍या राष्‍ट्रीय महिला आयोगाच्‍या सदस्‍यदेखील होत्‍या. परंतु, गेल्‍या वर्षी गुवाहाटी येथे अल्‍पवयीन मुलीची छेड काढल्‍याप्रकरणात वादग्रस्‍त केल्‍यामुळे त्‍यांना निलंबित करण्‍यात आले होते.

लांबा यांनी कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांच्‍यावर कडाडून टीका केली. त्‍या म्‍हणाल्‍या, मी कॉंग्रेसला अनेक वर्षे दिली. परंतु, तिथे माझे म्‍हणणे ऐकून घ्‍यायला कोणीही तयार नाही. कॉंग्रेसमध्‍ये सर्व निर्णय बंद दरवाजांच्‍या आड घेतले जातात, असे मला आता वाटू लागले आहे.

लांबा म्‍हणाल्‍या, कॉंग्रेसमध्‍ये सर्वसामान्‍य कार्यकर्ते आणि नेत्‍यांना महत्त्व दिल्‍या जात नाही. त्‍यांचे म्‍हणणे ऐकून घेणारा कोणीही नाही. मी अनेकदा राहुल गांधींची भेट घेण्‍याचा प्रयत्‍न केला. गेल्‍या तीन वर्षांपसून मला त्‍यांची भेट मिळाली नाही. अनेकदा पत्रही पाठविले. परंतु, कोणीही लक्ष दिले नाही. असे का झाले, यावर त्‍या म्‍हणाल्‍या, ही सत्तेची नशा आहे. दिल्‍लीत आम्‍ही 15 वर्षे राज्‍य केले. देशावर 10 वर्षांपासून राज्‍य करत आहोत. त्‍यामळे या गोष्‍टींकडे लक्ष देण्‍यासाठी आम्‍हाला शुद्धच नाही.

काय म्‍हणाल्‍या अलका लांबा... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..