नवी दिल्ली- परिवहनमंत्र्यांबाबतदिलेल्या वक्तव्यामुळे अलका लांबा यांचे आम आदमी पक्षाने प्रवक्ता पदावरून निलंबन केले आहे. संसदीय सचिव वादामुळे आधीच त्यांचे विधानसभा सदस्यत्व धोक्यात आहे.
पदावरून निलंबित झाल्यानंतर लांबा म्हणाल्या की, मी पक्षाची शिस्तबद्ध कार्यकर्ता असून पक्षाच्या या निर्णयाचा सन्मान करते. अनवधानाने चूक झाली असल्यास मी त्याचे नक्की प्रायश्चित्त करेन. प्रीमियम बस घोटाळा प्रकरणाची योग्यप्रकारे चौकशी व्हावी यासाठी दिल्लीचे परिवहनमंत्री गोपाल राय यांनी राजीनामा दिला, असे लांबा यांनी म्हटले होते. मात्र, गोपाल राय तब्येतीच्या कारणावरून आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे अलका लांबा यांचे हे वक्तव्य पक्षाच्या धोरणानुसार नसल्याचा ठपका लावण्यात आला आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)