आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All AAP Female Candidates Won In Delhi Assembly Election

AAP ची महिला ब्रिगेड, पाचही उमेदवारांनी नोंदविला दणदणीत विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निम्म्या लोकसंख्येने असलेल्या महिलांच्या अधिकारांची आणि त्यांच्या सुरक्षेचा दावा करणार्‍या आम आदमी पार्टीने दिल्लीत भलेही ऐतिहासिक विक्रमी विजय मिळविला असला तरी महिलांना उमेदवारी देण्यात हात आखडता घेतला होता. पक्षाने फक्त पाच महिलांना उमेदवारी दिली होती. या पाचही महिलांनी विजय मिळवून मैदान गाजवले आहे.
यातील दोन महिला या गेल्या निवडणुकीतही पक्षाच्या उमेदवार होत्या आणि विजयी झाल्या होत्या. त्यात मंगोलपूरी येथील राखी बिर्ला आणि शालीमार मतदार संघातील वंदना कुमारी या माजी आमदार होत्या. याशिवाय आरके पुरम येथील प्रमिला टोकस आणि चांदणी चौक येथील अलका लांबा या काँग्रेसमधून आपमध्ये आल्या होत्या. तर, पाचव्या आणि शेवटच्या पालम येथून निवडणूक लढलेल्या भावना गौड यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखविला होता. यावेळी त्यांनी त्यांच्यावरील विश्वास सार्थ करुन दाखविला आहे.
2013 मध्ये होत्या सहा महिला उमेदवार
2013 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाने सहा महिलांना तिकीट दिले होते. त्यातील बल्लीमारान येथील फरहान अंजुम आणि पटेल नगर येथील वीना आनंद याचे तिकीट यंदा कापण्यात आले. तर, गेल्यावेळी पक्षाच्या स्टार प्रचारक राहिलेल्या संस्थापक सदस्य आणि 2013 च्या निवडणुकीत आरके पुरम येथून फक्त काही मतांनी पराभूत झालेल्या महिला नेत्या शाजिया इल्मी यांनी यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर आपची साथ सोडून भाजपशी संधान बांधले होते.
फोटो - आपच्या अलका लांबा. चांदनी चौक येथून त्या विजयी झाल्या, त्यांनी भाजपच्या सुमन गुप्ता यांचा पराभव केला.
पुढील स्लाइडमध्ये, आपची महिला ब्रिगेड कोठून जिंकली आणि कोणाला पराभूत केले.