आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सर्वांना घर’साठी राज्याला ५६१ कोटींचा पहिला हप्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-केंद्र सरकारने ‘सर्वांसाठी घर’ योजनेअंतर्गत राज्यांना ४,००० कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी केला आहे. योजना सुरू करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली आहे. सर्वाधिक म्हणजे ५६१ कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत.
त्यानंतर उत्तर प्रदेशला ३७० कोटी, पश्चिम बंगालला ३०७ कोटी, मध्य प्रदेशला २५३ कोटी, आंध्र प्रदेशला २२५ कोटी तर कर्नाटकला २०४ कोटी रुपये देण्यात आले. सरकारने २५ जूनला ‘सर्वांसाठी घर (शहर)’ ही योजना सुरू केली होती. सध्या देशात २ कोटी घरांचा तुटवडा आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याची सरकारची योजना आहे. दरम्यान, म्हाडाची रिकामी घरे १५ ते २० % कमी दराने विकण्याचा निर्णय घेतल्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितले.