आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात IPSची ३०२ पैकी ६२ पदे रिक्त; देशभरात ९०६ जागांवर नियुक्तीच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय पोलिस सेवेची (आयपीएस) ९०६ पदे रिक्त असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १२९ पदे उत्तर प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात ३०२ पदे मंजूर असून ६२ पदे रिक्त आहेत.

गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, आयपीएसच्या ४, ७५४ पदे मंजूर अाहेत. मात्र, १ जानेवारी २०१५ ला ९०६ पदे रिक्त होती. सध्या ३,८४८ अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळाली असून २०१४ च्या आयपीएस तुकडीचे १४५ जण प्रोबेशनवर काम करत आहेत.

ही रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने ‘मर्यादित स्पर्धा परीक्षा’ ही आयपीएस भरतीसाठी पर्यायी व्यवस्था तयार केली आहे. विशिष्ट पात्रता निकष करणारे राज्य पोलिस सेवेतील पोलिस उपअधीक्षक, केंद्रीय निमलष्करी दलाचे सहायक कमांडंट आणि लष्करातील कॅप्टन आणि मेजर ही परीक्षा देऊ शकतात. त्यातून निवड केली जाईल. मात्र अनेक जणांनी या भरती पद्धतीला न्यायालयात आव्हान दिले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.