आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Jandhan Account Join Adhaar, Prime Minister Narendra Modi Instruction

सर्व जनधन खाती ‘आधार’ला जोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जनधन खाती आधारशी जोडण्याची सूचना दिली आहे. त्यांनी बँकांना या दिशेने प्रयत्नांना गती देण्याचा आग्रहही केला. जनधन योजना यशस्वी झाल्यानंतर मोदींनी सर्व बँकर्सना पाठवलेल्या ई-मेलमध्ये ही सूचना केली आहे. देशातील ९९.७४ टक्के कुटुंबे जनधनच्या कक्षेत आल्याचा केंद्राचा दावा आहे. मोदींनी २६ जानेवारी २०१५ या निर्धारित वेळेआधीच उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल बँकांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले की, भविष्यात इतर योजनांसाठी डीबीटी प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची सरकारची इच्छा आहे.
त्याअंतर्गत सरकारी मदत थेट बँक खात्यांत दिली जाईल.

आधारला जनधनशी जोडण्याची सूचना करताना मोदींनी म्हटले आहे की, बँक मित्रांनी रूपे कार्ड आणि आधारशी संबंधित व्यवहार गावांतच करावेत. सरकारने जनधन योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू केली होती.